agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

राज्यात बहुतांश भागांत थंडी दाखल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पुणे : राज्यातील बहुतांशी भागांत थंडी दाखल झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली. शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठवाजेपर्यंत नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १४.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : राज्यातील बहुतांशी भागांत थंडी दाखल झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली. शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठवाजेपर्यंत नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच १४.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

देशातून परतीचा पाऊस गेला असला, तरी कर्नाटकाच्या काही भागांत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत हलका पाऊस पडत आहे. आज (शनिवारी) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही येत्या गुरुवार (ता. २) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या सूर्य मकरवृत्ताकडे हळूहळू सरकत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार होत आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. डहाणूमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ होऊन ३७.२ अंश सेल्सिअसची सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. साताऱ्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत घट झाली असून, २१.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर नगर, कोल्हापूर, जळगाव, अकोला येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी घट झाली.    

शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल, कंसात किमान तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये :  मुंबई ३६.३ (२५.५), सांताक्रूझ ३६.६ (२३.७), अलिबाग ३५.२ (२४.५), रत्नागिरी ३६.२ (२४.४), डहाणू ३७.२ (२३.०), पुणे ३१.७ (१८.९), नगर - (१५.०), जळगाव ३५.४ (१५.४), कोल्हापूर ३१.७ (२२.५), महाबळेश्वर २७.६ (१८.२), मालेगाव ३४.२ (१६.४), नाशिक ३२.४ (१४.५), सांगली ३२.२ (२१.५), 
सातारा ३२.६ (२१.८), सोलापूर ३४.१ (१८.६), उस्माबाद - (१६.१), औरंगाबाद ३२.६ (१७.२), परभणी ३३.८ (१८.०), नांदेड ३५.० (२०.५), अकोला ३५.५ (१७.३), 
अमरावती ३१.४ (१७.४), बुलडाणा ३२.५ (१८.४), ब्रह्मपुरी ३४.७ (१८.२), चंद्रपूर ३४.० (२०.६), गोंदिया ३३.३ (१८.२), नागपूर ३३.४ (१७.०), वाशीम ३४.०, 
वर्धा ३३.५ (१७.०), यवतमाळ ३५.० (१५.४)
 

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...