agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

पारा आणखी खालावला...
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे ः मॉन्सून परतल्यानंतर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात बहुतांश भागांतील हवामान काेरडे झाले आहे. परिणामी, राज्यातील थंडी वाढत असून, शनिवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे सर्वांत कमी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. तर सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद भिरा येथे झाली. 

पुणे ः मॉन्सून परतल्यानंतर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात बहुतांश भागांतील हवामान काेरडे झाले आहे. परिणामी, राज्यातील थंडी वाढत असून, शनिवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक येथे सर्वांत कमी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. तर सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद भिरा येथे झाली. 

पुढील चार दिवस बुधवार (ता. १) पर्यंत गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला अाहे. गेल्या २४ तासांत काेकण गाेवा मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर मध्य महाराष्ट्रच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. 

शनिवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले कमाल आणि किमान (कंसात) तापमान ः (अंश सेल्सिअस) 
मुंबई ३४.४ (२५.५), अलिबाग ३४.१ (२३.६), रत्नागिरी ३३ (२३.७), पणजी ३२.९ (२४.२), डहाणू ३३.८ (२२), भिरा ३५.५ (२१) पुणे ३१.१ (१९) नगर ३२.६ (१४.५), काेल्हापूर ३०.३ (२२.८), महाबळेश्‍वर २२.८ (१५.६), मालेगाव ३४ (१७.६), नाशिक ३२.४ (१४.२), सांगली ३१.४ (२२.१), सातारा ३२.६ (२०.९), साेलापूर ३३.९ (२०.५), आैरंगाबाद ३३.६ (१६.६), परभणी ३३.५ (१८.१), नांदेड ३३.५ (२१), अकाेला ३४.९ (१६.९), अमरावती ३१.८ (१७.२), बुलडाणा ३२ (१७.७), ब्रह्मपुरी ३३.८(१८.३), चंद्रपूर ३४ (२०.६), नागपूर ३३.८ (१७.८), वर्धा ३३.५ (१६.५), यवतमाळ ३३ (१५.४).

इतर अॅग्रो विशेष
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...
‘ई-नाम’ची व्याप्ती सर्वांच्या...स्पर्धाक्षम, पारदर्शक व्यवहारातून शेतीमालास अधिक...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...
हास्य योगाद्वारे सरकारचा निषेधनागपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा अभिनव...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...
जिरायती उटगीत केली फायदेशीर फळबाग...शेतीत एकाचवेळी गुंतवणूक धोक्याची ठरू शकते. दरही...
गोंधळलेला शेतकरी अन् विस्कळित नियोजनशेती क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व हे नियोजनाला आहे...
निराशेचे ढग होताहेत अधिक गडद७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   ...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...
कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या...नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष...