agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

कोकणच्या दक्षिण भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा
संदीप नवले
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पुणे : कोकणच्या दक्षिण भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा असून त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूंपातर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यत हलका पाऊस  पडला.

थंडीत चढउतार होत असले, तरी नगर आणि नाशिकमध्ये हळूहळू थंडी वाढ होऊ लागली आहे. उर्वरित भागांतही किमान तापमान काही प्रमाणात कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यत नगरमध्ये 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : कोकणच्या दक्षिण भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा असून त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूंपातर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यत हलका पाऊस  पडला.

थंडीत चढउतार होत असले, तरी नगर आणि नाशिकमध्ये हळूहळू थंडी वाढ होऊ लागली आहे. उर्वरित भागांतही किमान तापमान काही प्रमाणात कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यत नगरमध्ये 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली आहे. डहाणूमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या चांगलीच वाढ झाली असून 36.1 अंश सेल्सिअसची सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ मुंबईतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 2.0 अंश सेल्सिअसने घट होऊन 35.8 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, मालेगाव, जळगाव, परभणी, अकोला येथील कमाल तापमानात वाढ झाली. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होते. नगरमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.6 अंशाने घट होऊन 12.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशाने घट होऊन 16.5 अश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले.

पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, परभणी, भिरा येथील तापमानातही घट झाली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, मालेगाव, अकोला येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने वाढ झाली.  पुणे परिसरातही रविवार (ता.5) पर्यत आकाश अंशत ढगाळ राहील.

सोमवारी (ता.30) सकाळी आठ वाजेपर्यतचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई 35.8 (25.0), सांताक्रूझ 35.6 (22.2), अलिबाग 33.4 (22.2), रत्नागिरी 34.7 (23.5), डहाणू 36.1 (21.6), भिरा (19.5), पुणे 30.8 (16.1), नगर (12.5), जळगाव 34.7 (16.0), कोल्हापूर 29.3 (20.1), महाबळेश्वर 25.2 (16.0), मालेगाव 33.0 (16.5), नाशिक 32.1 (14.8), सांगली 30.0 (18.4), सातारा 29.6 (16.5), सोलापूर 32.5 (16.5), उस्माबाद - (12.6), औरंगाबाद 32.7 (16.6), परभणी 32.9 (16.5), नांदेड 33.0 (17.5), बीड 32.0 (16.0), अकोला 34.5 (19.0), अमरावती 32.2 (18.6), बुलढाणा 31.0 (18.4), ब्रह्मपुरी 34.1 (19.1), चंद्रपूर 32.8 (20.8), गोंदिया 32.0 (18.0), नागपूर 32.9 (19.0), वाशीम - (16.0), वर्धा 32.7 (17.9), यवतमाळ 32.5 (16.4)

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...