मराठवाड्यात थंडीने पसरले पाय

मराठवाड्यात थंडीने पसरले हातपाय
मराठवाड्यात थंडीने पसरले हातपाय

पुणे : मध्य महाराष्ट्रपाठोपाठ आता मराठवाड्यातील किमान तापमानातही घट होऊ लागली आहे. परिणामी, येथे थंडीने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी (ता. 31) सकाळी आठ वाजेपर्यत उस्मानाबादमध्ये 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षीही 28 ऑक्‍टोबर रोजी उस्मानाबादमधील किमान तापमानाचा पारा 12.5 अंशावर होता. उस्मानाबादमधील 2007 ते 2015 या कालावधीतील किमान तापमान पाहिले, तर 13 ते 20 अंश सेल्सिअसपर्यत तापमान राहिले. परंतु, गेल्या वर्षीपासून येथील किमान तापमानाचा पारा कमी होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून वारे वाहू लागले आहे. दक्षिणेकडील तापमानात वाढ होऊ लागली असल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही सोमवार (ता. 6) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील.

कोकण, गोव्यात काही भागांत कमाल तामपानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. अलिबागमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या चांगलीच वाढ झाली असून 36.6 अंश सेल्सिअसची सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण, गोव्यात उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होते. सोलापुरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशाने घट होऊन 14.5 अश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, परभणी, भिरा, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, मालेगाव, अकोला येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने घट झाली.

मंगळवारी (ता.31) सकाळी आठ वाजेपर्यतचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई 35.0 (25.5), सांताक्रूझ 35.9 (34.5), अलिबाग 36.6 (22.4), रत्नागिरी 36.0 (22.3), डहाणू 35.1 (21.4), भिरा (19.5), पुणे 30.8 (15.3), नगर 33.0 (15.0), जळगाव 34.2 (15.0), कोल्हापूर 31.0 (18.8), महाबळेश्वर 25.1 (15.6), मालेगाव 32.0 (15.8), नाशिक 31.2 (12.8), सांगली 31.3 (17.3), सातारा 30.2 (14.4), सोलापूर 32.3 (14.5), उस्मानाबाद - (12.5), औरंगाबाद 32.2 (15.6), परभणी 32.5 (17.0), नांदेड 33.5 (17.0), बीड 33.0, अकोला 34.9 (16.4), अमरावती 32.0 (16.4), बुलडाणा 31.2 (17.2), ब्रह्मपुरी 34.2 (17.3), चंद्रपूर 33.0 (19.8), गोंदिया 32.2 (16.8), नागपूर 33.3 (15.3), वाशीम 33.0, वर्धा 33.1 (17.0), यवतमाळ 34.5 (15.6)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com