agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

कोकणात सोमवारी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

तमिळनाडूतील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम केरळ, कर्नाटकसह राज्याच्या काही भागात होणार आहे. पुढील आठवड्यात कोकणाच्या दक्षिण भागात हलका पाऊस होईल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
-ए. के श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

पुणे : तमिळनाडूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूंपातर झाले आहे. त्यामुळे तमिळनाडू, श्रीलंकेच्या काही भागात, केरळ, आंध्र प्रदेशच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. तमिळनाडूच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. तमिळनाडूतील कमी दाबाच्या पट्याचा परिणाम कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रावर होण्याची शक्‍यता आहे. परिणामी गोवा व कोकणाच्या दक्षिण भागात सोमवारी (ता. 5) तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे थंडी चांगलीच जोर धरू लागली आहे. बुधवारी (ता. 1) सकाळी आठ वाजेपर्यंत नगरमधील किमान तापमानाचा पारा 5.5 अंशापर्यंत घसरला असून, चांगलीच थंडी वाढली आहे. सध्या नगरमध्ये सर्वांत कमी म्हणजेच 11.6अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून वारे वाहू लागले आहे. दक्षिणेकडील तापमानात वाढ होऊ लागली असल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही मंगळवार (ता. 7) पर्यंत आकाश अंशत ढगाळ राहील. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तामपानात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली आहे.

मुंबईमध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशापर्यंत वाढ झाली असून, 35.8 अंश सेल्सिअसची सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली, परभणी, अकोला येथील कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने घट झाली, तर मालेगाव, कोल्हापूर, पुणे, नाशिक येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होते. राज्यात मुंबई वगळत उर्वरित बहुतांशी सर्वच प्रमुख शहरांतील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंशाने घट झाली आहे.

बुधवारी (ता.1) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल, कंसात किमान तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई 35.8 (25.2), सांताक्रूझ 35.8 (22.6), अलिबाग 34.0 (21.6), रत्नागिरी 35.3 (20.1), डहाणू 34.1 (21.2), भिरा (19.0), पुणे 30.4 (14.2), नगर (11.6), जळगाव 34.0 (14.4), कोल्हापूर 30.7 (18.7), महाबळेश्वर 25.3 (16.0), मालेगाव 30.1 (15.2), नाशिक 31.0 (12.2), सांगली 32.0 (17.1), सातारा 30.6 (15.2), सोलापूर 32.7 (14.8), उस्मानाबाद - (12.9), औरंगाबाद 32.6 (15.0), परभणी 32.5 (15.1), नांदेड 33.5 (17.5), बीड 32.4, अकोला 34.8 (15.8), अमरावती 31.6 (17.8), बुलढाणा 31.5 (17.0), ब्रम्हपुरी 33.6 (15.9), चंद्रपूर 33.2 (19.6), गोंदिया 31.6 (15.2), नागपूर 33.2 (14.3), वाशिम 33.0, वर्धा 33.0 (16.2), यवतमाळ 34.0 (14.4)

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...