agriculture news in marathi, weather, forecast, temperature, pune | Agrowon

मध्य महाराष्ट्र, विदर्भातील किमान तापमानात घट
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गुरुवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत नगर येथे ११.८ सेल्सिअसची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तमिळनाडूतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा व कोकणाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. ५) सोमवारी (ता. ६) तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही बुधवार (ता.८) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील.

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. गुरुवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत नगर येथे ११.८ सेल्सिअसची नोंद झाली, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तमिळनाडूतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा व कोकणाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. ५) सोमवारी (ता. ६) तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांत हवामान ढगाळ होते. पुणे परिसरातही बुधवार (ता.८) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील.

राज्यात येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून वारे वाहू लागले आहेत. दक्षिणेकडील तापमानात वाढ होऊ लागली असल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील नगर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.२ अंशांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे थंडी चांगलीच जोर धरू लागली आहे.

मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होते. राज्यात मुंबई वगळत उर्वरित बहुतांशी सर्वच प्रमुख शहरांतील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते चार अंशाने घट झाली आहे.

गुरुवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई २५.४, सांताक्रूझ २४.४, अलिबाग २२.४, रत्नागिरी २२.७, डहाणू २०.७, भिरा २०.५, पुणे १४.०, नगर ११.८, जळगाव १३.८, कोल्हापूर १८.७, महाबळेश्वर १४.६, मालेगाव १५.४, नाशिक ११.८, सांगली १७.२, सातारा १५.१, सोलापूर १४.५, उस्मानाबाद १२.१, औरंगाबाद १५.०, परभणी १४.०, नांदेड १७.०, अकोला १६.२, अमरावती १७.६, बुलढाणा १६.०, ब्रह्मपुरी १७.२, चंद्रपूर १९.४, गोंदिया १५.२, नागपूर १६.३, वाशीम १७.०, वर्धा १७.०, यवतमाळ १५.०.

इतर अॅग्रो विशेष
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही...कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी...
उसाला प्रतिटन २०० ते २२५ अनुदान मिळणार...नवी दिल्ली : साखर कारखान्यांन्या साखरेच्या...
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः...नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
साखरेच्या विक्री दरात क्विंटलला २००...नवी दिल्ली : साखर विक्रीचा दर २९०० वरून ३१००...
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'...श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "...
एक रुपयाची लाच घेतल्यास भ्रष्ट...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात...
सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढसांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
`पॉलिहाउस, शेडनेटधारकांना कर्जमुक्ती...नगर : सरकारची धरसोडीची धोरणे, दुष्काळ,...