agriculture news in marathi, weather forecast,minimum temperate | Agrowon

थंडीत हलकी वाढ; हवामान कोरडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे वाहू लागले आहेत. राज्यात गायब झालेली थंडी किंचित वाढली आहे. विदर्भातील नागपूर येथे ११ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे वाहू लागले आहेत. राज्यात गायब झालेली थंडी किंचित वाढली आहे. विदर्भातील नागपूर येथे ११ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भाच्या काही भागांत किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तामपान सरासरीच्या जवळपास होते. येत्या सोमवार (ता. १९) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही बुधवार (ता. २१) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील. 

सध्या कोकणातील किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. अलिबाग येथे १९.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तामपानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. मालेगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान होते. मराठवाड्यात थंडीत चढउतार सुरू आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात १४.५ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. विदर्भात पुन्हा थंडी वाढली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. 

गुरूवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २४.० (६), अलिबाग १९.० (१), रत्नागिरी २२.५ (३), भिरा २५.० (९), डहाणू २२.८ (५), पुणे १५.४ (३), नगर १६.६ (३), जळगाव १४.२, कोल्हापूर २०.० (४), महाबळेश्वर १४.४, मालेगाव १३.४ (१), नाशिक १४.० (२), निफाड १३.६, सांगली १९.७ (५), सातारा १८.३ (४), सोलापूर १७.९, औरंगाबाद १६.६ (३), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १४.५, परभणी शहर १६.१ (-१), नांदेड १७.० (२), उस्मानाबाद १२.७, अकोला १६.६ (१), अमरावती १४.२ (-३), बुलढाणा १५.२ (-१), चंद्रपूर १५.८ (-१), गोंदिया ११.८ (-४), नागपूर ११.० (-५), वर्धा १३.६ (-१), यवतमाळ १५.० (-२).

इतर अॅग्रो विशेष
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...
दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी...देशात दुधाचा ओघ वाढ आहे. इतरवेळी जेवढी मागणी...
दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर...पुणे ः महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध...
दूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफीलपुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे...
राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्तमंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य...
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा...
दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा...वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा...
दूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुललाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर...
येडियुरप्पांची आज अग्निपरिक्षानवी दिल्ली  : कर्नाटकात सत्ता स्थापन...
पिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉलनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी...
निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...
मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरणपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या...