agriculture news in marathi, weather forecast,minimum temperate | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीत घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे विदर्भात किंचित थंडी आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी कमी झाली आहे. विदर्भातील नागपूर येथे ११.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे विदर्भात किंचित थंडी आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी कमी झाली आहे. विदर्भातील नागपूर येथे ११.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानाता सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

कोकणातील भिरा येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंशांनी वाढ झाली. तर डहाणू येथे २०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी झाली आहे. उन्हाचा चटका वाढू लागला आहे. निफाड येथे १२.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान होते. मराठवाड्यात थंडी कमी झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात १४.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. विदर्भातील अनेक भागांत किंचित थंडी आहे. किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. 

शुक्रवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (२), अलिबाग २१.१ (३), रत्नागिरी २१.६ (२), भिरा २१.० (६), डहाणू २०.० (२), पुणे १५.४ (३), नगर १३.०, जळगाव १४.४, कोल्हापूर १९.२ (३), महाबळेश्वर १६.१ (२), मालेगाव १४.६ (२), नाशिक १४.१ (२), निफाड १२.६, सांगली १७.९ (३), सातारा १५.७ (१), सोलापूर १८.६ (१), औरंगाबाद १५.२ (१), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १४.५, परभणी शहर १४.९ (-२), नांदेड १६.० (१), अकोला १५.४ (-१),  अमरावती १४.० (-३), बुलडाणा १५.४ (-२), चंद्रपूर १४.२ (-३), गोंदिया ११.५ (-५), नागपूर ११.० (-५), वर्धा १२.६ (-४), यवतमाळ १६.० (-२)

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...