agriculture news in marathi, weather forecast,minimum temperate | Agrowon

उन्हाचा चटका जाणवू लागला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ लागला आहे. राज्यातील थंडी कमी होऊ लागली असून, किमान तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानाचा पाराही वाढू लागला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ लागला आहे. राज्यातील थंडी कमी होऊ लागली असून, किमान तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानाचा पाराही वाढू लागला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नैर्ऋत्याकडून काही प्रमाणात वारे वाहू लागले आहे. तसेच हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. सध्या कोकणातील थंडी कमी झाली आहे. किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. मुंबई, रत्नागिरी, डहाणू येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. अलिबाग, भिरा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले. मध्य महाराष्ट्रातही थंडी गायब झाली आहे. पुणे, जळगाव, महाबळेश्वर, सांगली येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले. मालेगाव, नाशिक, निफाड, सातारा येथे किंचित थंडी आहे.

मराठवाड्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे हवेत किंचित आर्द्रता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांशी भागांत किंचित थंडी आहे. परभणी शहर, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले. बीडमधील तापमान सरासरीएवढे आहे. औरंगाबादमध्ये थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडी आहे. मात्र, येत्या काही दिवसांत ही थंडी कमी होण्याची शक्यता असून उन्हाचा पारा हळूहळू वाढेल. अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेल्सिअसने घटले आहे. यवतमाळमध्ये तापमान सरासरीएवढे आहे.

रविवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.९, अलिबाग १९.८ (२), रत्नागिरी १९.४, भिरा १७.५ (२), डहाणू १८.३, पुणे १३.७ (२), जळगाव १२.२ (२), कोल्हापूर १८.९ (३), महाबळेश्वर १६.० (२), मालेगाव १३.८ (१), नाशिक १२.३ (१), निफाड १२.०, सांगली १७.३ (२), सातारा १५.४ (१), सोलापूर १८.३, औरंगाबाद १४.४ (१), बीड १४.६, परभणी शहर १५.० (-२), नांदेड १४.० (-१), अकोला १५.५ (-१), अमरावती १६.० (-१), बुलडाणा १६.० (-१), चंद्रपूर १८.० (१), गोंदिया १३.७ (-२), नागपूर १३.४ (-३), वर्धा १५.० (-१), यवतमाळ १७.४

इतर अॅग्रो विशेष
उठलेला बाजारसंसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन...
न्यायाच्या प्रतीक्षेत आदिवासी शेतकरी राज्यातील आदिवासी भागात लाखो शेतकरी आपल्या...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
उसाला निर्यातक्षम केळीची जोडसांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...