agriculture news in marathi, weather forecast,minimum temperate | Agrowon

केवळ विदर्भातच थंडी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पहाटे हवेतील गारवा कमी होऊ लागला असून, थंडी कमी झाली आहे. विदर्भातील काही भागांत किंचित थंडी आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १२.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पहाटे हवेतील गारवा कमी होऊ लागला असून, थंडी कमी झाली आहे. विदर्भातील काही भागांत किंचित थंडी आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १२.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. सध्या गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आहे. येत्या गुरुवारपर्यंत (ता. २२) संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही येत्या शनिवार (ता.२४) पर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील थंडी कमी होऊ लागली असून, किमान तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे. त्याचबरोबर कमाल तापमानाचा पाराही वाढू लागला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. सध्या कोकणात थंडी कमी झाली आहे. किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. रत्नागिरी, डहाणू येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. अलिबाग, भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले. मध्य महाराष्ट्रातही थंडी गायब झाली आहे. पुणे, महाबळेश्वर, सांगली येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले. मालेगाव, नाशिक, सातारा येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढला आहे.

मराठवाड्यातील बहुतांशी भागात किंचित थंडी आहे. परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले. बीडमधील तापमान सरासरीएवढे आहे. औरंगाबाद, नांदेडला थंडी कमी झाली असून, उन्हाचा चटका वाढलेला दिसून येतो. विदर्भातील गोंदिया, नागपूर भागात किंचित थंडी आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ही थंडी कमी होण्याची शक्यता असून, उन्हाचा पारा हळूहळू वाढेल. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा येथील किमान तापमानात सरासरी एवढे होते. अमरावती, चंद्रपूर येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे.

सोमवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १७.४ (-१), अलिबाग १९.५ (१), रत्नागिरी १९.६, भिरा १७.० (१), डहाणू १७.८, पुणे १३.८ (२), जळगाव १२.६ (-२), कोल्हापूर १९.१ (३), महाबळेश्वर १६.४ (२), मालेगाव १३.६ (१), नाशिक १२.४ (१), निफाड १२.२, सांगली १७.३ (२), सातारा १५.१ (१), सोलापूर १९.१ (१), औरंगाबाद १५.४ (२), बीड १४.६, परभणी शहर १६.० (-१), नांदेड १६.० (१), अकोला १६.३, अमरावती १९.२ (२), बुलडाणा १७.२, चंद्रपूर १९.० (२), गोंदिया १३.८ (-२), नागपूर १२.६ (-२), वर्धा १६.५, यवतमाळ १७.४

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....