राज्यावर हलके ढग

राज्यावर हलके ढग, तीव्रता कमी
राज्यावर हलके ढग, तीव्रता कमी

पुणे  ः गोव्याचा दक्षिण भाग वगळता, महाराष्ट्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्प खाली सरकत आहे. शुक्रवारी (ता.२३) पहाटे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पडल्याची स्थिती होती. कोकण, मध्य महाराष्ट्रात असलेल्या कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव अधिक नाही. त्यामुळे मंगळवार (ता.२७) पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे १२.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी (ता.२३) नाशिकचा मध्य भाग, नंदुरबारचा बहुतांशी भाग, धुळ्याच्या उत्तरेकडील भाग, जळगावचा बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण तयार झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचा बहुतांशी भाग, साताऱ्याचा सह्याद्री पर्वतरांगाकडील पश्चिम भाग, कोल्हापूरचा बहुतांश भाग, सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, काही अंशी ढगाळ वातावरण होते.

राज्यातील नगरचा निम्मा उत्तर भाग, औरंगाबादचा काही दक्षिण भाग, जालना जिल्हा बहुतांश भाग, परभणी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग, उस्मानाबाद जिल्हा बहुतांश भाग, लातूर जिल्ह्यात मध्य भाग, नांदेड जिल्ह्याचा यवतमाळकडील पूर्व-उत्तरेच्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागातील अमरावतीचा उत्तर भाग, बुलडाणा, वाशीम, अकोला, हिंगोली जिल्ह्यांतील काही भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा नांदेड हिंगोली कडील पश्चिम-दक्षिण भाग ढगाळ राहील. विदर्भात वर्धा जिल्ह्याचा काही भाग, भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा बहुतांशी भाग, चंद्रपूरचा बऱ्यापैकी सर्व भाग, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण भाग, वातावरण ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

नांदेड जिल्ह्याचा व यवतमाळ जिल्ह्यात जास्त प्रमाणात ढगांची दाटी आहे. त्यामुळे तेथील वातावरण खूप ढगाळ राहील. तसेच परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील परभणीचा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल. उस्मानाबाद जिल्ह्याचा मध्य दक्षिण भाग व लातूर जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल.

अवकाळी पावसाची चाहूल राजस्थान व गुजरात, कच्छ येथे लागली आहे. त्याचा वेग कमी असून तो जैसलमेर,जोधपूर, भूज, कराची या भागामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात, गुजरातच्या दक्षिण भागात प्रवेश करील असे संकेत आहेत. शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) २०.४ (२), अलिबाग २०.६ (२), रत्नागिरी २२.४ (३), भिरा १८.५ (२), डहाणू २०.३ (२), पुणे १५.५ (२), नगर १५.६ (१), जळगाव १५.०, कोल्हापूर २०.१ (३), महाबळेश्वर १६.६ (२), मालेगाव १६.० (३), नाशिक १५.० (३), निफाड १२.६, सांगली २०.० (४), सातारा १७.० (२), सोलापूर २१.१ (३), औरंगाबाद १८.० (४), बीड १६.४ (१), उस्मानाबाद १५.५, परभणी शहर १७.४, नांदेड १९.० (३), अकोला २०.३ (४), अमरावती १९.८ (२), बुलडाणा १९.५ (२), चंद्रपूर २१.२ (४), गोंदिया १५.२ (-१), नागपूर १६.२, वर्धा १८.९ (२), यवतमाळ २१.० (३) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com