agriculture news in marathi, weather forecast,minimum temperate | Agrowon

मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीत वाढ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

पुणे : मध्य महाराष्ट्रातील काही भागात हवेत बाष्प असल्याने किंचित थंडी वाढली आहे. दिवसाचे कमाल तापमानतही एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा येथे १३.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे : मध्य महाराष्ट्रातील काही भागात हवेत बाष्प असल्याने किंचित थंडी वाढली आहे. दिवसाचे कमाल तापमानतही एक ते दोन अंश सेल्सिअसने घटले आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा येथे १३.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या शुक्रवार (ता. २) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही रविवार (ता. ४)पर्यंत आकाश निरभ्र राहील. 

कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हवेतील बाष्प कमी होऊ लागले आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊ लागली असून, उन्हाच्या झळाही सकाळपासून तीव्र होऊ लागल्या आहेत. कोकणातील अलिबाग, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढले आहे. 

मराठवाड्यातील किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. औरंगाबाद येथे किमान तापमानाची १८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर येथील किमान तापमान वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

सोमवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २०.६ (१), अलिबाग २२.० (३), रत्नागिरी १९.१ (-१), डहाणू २२.५ (३), पुणे १४.० (१), नगर १३.६ (-२), जळगाव १८.२ (३), कोल्हापूर १८.०, महाबळेश्वर १७.८ (३), मालेगाव १८.२ (४), नाशिक १६.५ (३), निफाड १४.८, सांगली १५.७, सातारा १३.५ (-२), सोलापूर १६.६(-३), औरंगाबाद १८.८ (४), उस्मानाबाद १४.१, परभणी शहर १६.४ (-१), नांदेड १७.०, अकोला २१.१ (४), अमरावती २०.६ (२), बुलढाणा २०.३ (२), चंद्रपूर २१.६ (३), गोंदिया १७.५ (१), नागपूर २०.१ (३), वर्धा १९.५ (२), यवतमाळ १९.४ (१).

इतर अॅग्रो विशेष
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...
दुष्काळ, मजूरटंचाई समस्येवर सीताफळ,...अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके...
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...