agriculture news in marathi, weather forecast,slit rise in minimum and maximum temperate | Agrowon

राज्यात किमान-कमाल तापमानात किंचित वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ हवामान होते. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होत होता. रविवारी (ता. २५) राज्यात कोरडे हवामान झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा येथे १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ हवामान होते. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होत होता. रविवारी (ता. २५) राज्यात कोरडे हवामान झाल्याने उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा येथे १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शनिवारी (ता. २४) सायंकाळी जळगाव, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागावर ढगाळ हवामान होते. त्यामुळे सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगावच्या काही भागात भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या गुरुवार (ता. १) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही शनिवार (ता. ३) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील.

कोकणातील भिरा येथे किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू येथील किमान तापमानाचा पाराही सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने वाढला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. मध्य महाराष्ट्रातही बहुतांशी भागात सकाळपासून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. नागरिक दुपारी सावलीचा आधार घेऊ लागले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड वगळता उर्वरित भागातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भातील अनेक भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन अंशांपर्यंत वाढला आहे. तर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी विदर्भात उन्हाची तीव्रता चांगलीच वाढू लागल्याचे दिसून येते.

रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २०.५ (१), अलिबाग २०.६ (२), रत्नागिरी २१.५ (१), भिरा २०.५ (३), डहाणू २२.४ (२), पुणे १५.८ (२), नगर १७.५ (२), जळगाव १७.६ (२), कोल्हापूर १९.४ (१), महाबळेश्वर १७.४ (३), मालेगाव १८.६ (४), नाशिक १६.१ (३), निफाड १३.८, सांगली १९.७ (३), सातारा १५.५, सोलापूर १९.१, औरंगाबाद १७.४ (२), उस्मानाबाद १५.५, परभणी शहर १६.६ (१), नांदेड १९.० (३), अकोला २१.७ (५), अमरावती २०.२ (२), बुलढाणा २०.८ (३), चंद्रपूर २१.६ (४), गोंदिया १५.६ (-१), नागपूर १७.३, वर्धा १९.५ (२), यवतमाळ २२.४ (५). 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...