agriculture news in marathi, weather, forrecasting, pune, maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता
संदीप नवले
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मंगळवार (ता. ३) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे ः राज्यातील काही भागात हवेचा दाब कमी जास्त होत आहे. त्यामुळे कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर कोकण, गोव्यात गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडल्याची नोंद शुक्रवारी (ता. २९) झाली.

कोकणातील बहुतांशी ठिकाणी शुक्रवारी (ता. २९) ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी सकाळपासून ऊन पडले होते. त्यामुळे कोकणात सकाळपासून उकाडा वाढला होता. मध्य महाराष्ट्रातील पुणे शहराच्या परिसरात हलका पाऊस पडला. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत कडक ऊन पडले होते.

त्यामुळे हवामानात सकाळपासून उकाडा वाढून कमाल तापमानात वाढ झाली होती. जळगावमध्ये कमाल तापमानाची ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मराठवाडा व विदर्भातही कडक ऊन पडल्याने चांगलाच उकाडा तयार झाला होता. परिणामी, कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती.

येत्या मंगळवार (ता. ३) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. ३०) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

शुक्रवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊसः मिलिमीटरमध्ये
कोकण ः कणकवली १४०, पेडणे, सांगे १००, देवगड ८०, केपे, राजापूर ७०, कानकोण, मालवण, उल्हासनगर ४०, महाड, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख, सांवतवाडी,
वैभववाडी ३०, अंबरनाथ, चिपळूण, गुहागर, खेड, कुडाळ २०.
मध्य महाराष्ट्र ः पन्हाळा, शिरोळ ६०, आजरा, मिरज, पळस, सागंली ५०, चंदगड, हातकणंगले, कडेगाव, कराड ४०, कागल, कोल्हापूर, शाहूवाडी,
वाई ३०, अक्कलकोट, खंडाळा, बावडा, पौड, मुळशी, राधानगरी, वाळवा, इस्लामपूर २०.
विदर्भ ः गोंदिया, मूल, मूलचेरा ३०, आरमोरी, ब्रह्मपुरी, कोरची २०, अहिरी, अर्जुनीमोरगाव, चार्मोर्शी, धानोरा, गडचिरोली, सडकअर्जुनी, सिंरोचा १०.

इतर अॅग्रो विशेष
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...
राज्यात वटाणा प्रतिक्विंटल २००० ते ४५००...पुणे ः राज्यातील वटाण्याचा हंगाम सध्या सुरू झाला...
विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांचे...पुणे : राज्यातील विनाअनुदानित कृषी...
नाशिकमध्ये ८३ आत्महत्याग्रस्त कुटुंबे...नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटनांना...
शेतीमालाची प्रतवारी, चाळणी सामग्री...पुणे : शेतीमालाची प्रतवारी व चाळणी सामग्री...
बोंड अळीला शासन, बियाणे कंपन्याच...जळगाव ः कपाशीचे बॅसीलस थुरीलेंझीस (बीटी) बियाणे...
शेतमाल खरेदीतील चुका शोधून एक महिन्यात...पुणे: दर्जा असूनही हमीभावाने शेतमालाच्या खरेदीत...
कृषिपंपांची काहींना चुकीची वीजबिले :...नागपूर ः सरकारने कृषिपंपांचे आठ हजार कोटींचे दंड...
`क्रॉपसॅप`मधील चार वर्षांच्या 'पीएफ'...पुणे : राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प...
किमान तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात कोरडे हवामान असून हळूहळू थंडी...
शेतीत फुलताहेत उद्यमशीलतेची बेटं गेल्या वर्षी ''महाएफपीसी'' आणि शेतकरी कंपन्यांनी...
सुस्त प्रशासन, स्वस्थ शासनराज्यात बीटी कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशकांची...
दूध संघांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमकनागपूर : राज्यात सध्या अडचणीत आलेल्या सहकारी दूध...
मुंबई बाजार समिती घोटाळ्यातील दोषींवर...नागपूर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंतअकोला : बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे...
महाराष्ट्रात हुडहुडी वाढणारपुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी...
देशभरातील शेतकरी संघटनांचा स्वतंत्र...राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोपप्रसंगी...