agriculture news in marathi, weather, heatwave in vidharbha, chandrapur 44.8 degree | Agrowon

उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट, वादळ, पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी दाणादाण उडवून दिली अाहे. तर तीव्र उन्हांच्या झळांनी विदर्भ होरपळून गेला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २०) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट, वादळ, पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी दाणादाण उडवून दिली अाहे. तर तीव्र उन्हांच्या झळांनी विदर्भ होरपळून गेला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २०) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जागतिक तापमानाचा विचार करता सौदी अरेबियाच्या ‘शरुराह’ हे पहिल्या क्रमांकाचे उष्ण ठिकाण ठरले अाहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये शरुराह येथे ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पहिल्या दहा उष्ण ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, अकोला, वर्धा ही ठिकाणे असल्याचे ‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४१ अंशांच्या वर गेले असून, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, मध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, नाशिक, सोलापूर येथे तापमान ४० अशांपार गेले आहे. राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

बुधवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, नगर ४२.१, कोल्हापूर ३८.०९, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४२.०, नाशिक ४०.२, सातारा ३९.१, सांगली ३८.५, सोलापूर ४१.०, मुंबई ३४.२, अलिबाग ३३.७, रत्नागिरी ३३.२, डहाणू ३५.१, आैरंगाबाद ४०.०, परभणी ४२.०, अकोला ४४.१, अमरावती ४३.०, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.०, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४०.८, नागपूर ४३.२, वर्धा ४४.०, यवतमाळ ४२.५.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...