agriculture news in marathi, weather, heavy rain damages crops | Agrowon

राज्यात वळवाने दाणादाण
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वारे, गारांसह पडलेल्या जोरदार पावसामुळे उन्हाळी पिके, भाजीपाला, उघड्यावर ठेवलेला कांदा, फळबागांना तडाखा बसला आहे. केळी पिकाचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला असून, सुमारे १ हजार हेक्‍टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाचा जोर प्रचंड असल्याने शेतांमध्ये पाणी साचण्याबराेबरच ओढे-नाल्यांनाही पूर आले.

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वारे, गारांसह पडलेल्या जोरदार पावसामुळे उन्हाळी पिके, भाजीपाला, उघड्यावर ठेवलेला कांदा, फळबागांना तडाखा बसला आहे. केळी पिकाचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला असून, सुमारे १ हजार हेक्‍टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी पावसाचा जोर प्रचंड असल्याने शेतांमध्ये पाणी साचण्याबराेबरच ओढे-नाल्यांनाही पूर आले. या पावसामुळे पूर्वमोसमी पेरण्यांना व खरीप पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी गारांसह पडलेल्या वादळी पावसाचा मोठा फटका बसला. कापणीवरील केळी बागांना मोठा फटका बसला असून, केळीची झाडे पूर्णत जमीनदोस्त होऊन सुमारे १०० कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याला पूर्वमोसमी पावसाचा दणका नगर जिल्ह्यामधील अकोले, नगर, राहाता, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर आदी तालुक्‍यांसह बहुतांश भागाला शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. वादळी पावसाने फळबागा, पॉलिहाउस, शेडनेट, शेतात काढून ठेवलेला कांदा व भाजीपाल्यांचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मका, फ्लॉवर, डाळिंब पिकांचे नुकसान झाले असून, कांदा भिजला आहे. 

सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्‍यांतील काही भागांत शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस भात आणि हळद पिकास उपयुक्त ठरणार आहे. पुणे जिल्ह्यात वादळी वारे, गारांसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे उन्हाळी बाजरी, मका, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबीसह भाजीपाला आणि केळी, आंबा फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक होता या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले तर ओढे-नाल्यांना पूर आले होते. सातारा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसाने उन्हाळी भुईमूग काढणीची कामे ठप्प होणार आहे, मात्र उसाला तसेच खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. 

विदर्भातील अकोला जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १) बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा तालुक्यात व परिसरात अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड तालुक्यात काही गावांमध्ये वादळ व पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या जांब समर्थ परिसरात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वारे, तुरळक गारांसह पाऊस झाला. केळी बागा आडव्या झाल्या तर डाळिंब, पपई, ऊस , मोसंबी, आंबे, साठवलेले कांदे, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुंभार पिंपळगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबादमधील हिमायतबाग फळबाग संशोधन केंद्रातील बागेलाही वादळाचा फटका बसला. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बीडमधील शिरूर कासार आदी तालुक्‍यांतील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व कामाला वेग येणार आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...