agriculture news in marathi, weather impact on grapes | Agrowon

बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा संकटाच्या फेऱ्यात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुके वाढू लागले आहे. याचा फटका द्राक्ष बागेला बसत आहे. उशिरा फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागेवर फळकूजसह अन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यातच घडामध्ये पाणीसाठल्याने उन्हामुळे द्राक्षावर डाग पडू लागले आहेत. बदलत्या वातावरणामुळे सुमारे ५ ते १० टक्के बागांचे नुकसान होण्याची शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुके वाढू लागले आहे. याचा फटका द्राक्ष बागेला बसत आहे. उशिरा फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागेवर फळकूजसह अन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यातच घडामध्ये पाणीसाठल्याने उन्हामुळे द्राक्षावर डाग पडू लागले आहेत. बदलत्या वातावरणामुळे सुमारे ५ ते १० टक्के बागांचे नुकसान होण्याची शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात बदलत्या वातावरणमुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षाची उशिरा फळ छाटणी घेतली आहे. आज मितीस ही छाटणी घेऊन सुमारे ७० ते ८० दिवस झाले असून द्राक्ष बागेत फुलोरा अवस्था आली आहे. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागले आहे. थंडीसह धुकेही पडू लागले आहे. धुक्‍यामुळे घडामध्ये पाणी साठून राहत असून फळ कूज होण्यास प्रारंभ झाला आहे. तर सकाळी धुके आणि दुपारी ऊन यामुळे उन्हाच्या तडाख्याने द्राक्षावर डाग पडू लागले. परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

याबाबत सांगली द्राक्ष संघाच्या विभागीय संचालक मारुती चव्हाण म्हणाले, की धुके अधिक वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्य केला पाहिजे. शेतात पाणी साठू देऊ नये. द्राक्षाची हाताळणी करू नका, ज्या शेतकऱ्यांनी उशिरा छाटणी घेतली आहे. त्यांनी नत्राचे प्रमाण योग्य ठेवल्यास फळ कूज होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. उन्हापासून द्राक्षाचा बचाव करण्यासाठी आच्छादन करा.

धुक्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ले घेऊन बुरशीनाशक फवारणीकरावी. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल.
- राजू पाटील, द्राक्ष उत्पादक, सावळज, जि. सांगली.

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...