कोकण, विदर्भात पावसाचा जोर उद्यापासून वाढणार

कोकण, विदर्भात पावसाचा जोर उद्यापासून वाढणार
कोकण, विदर्भात पावसाचा जोर उद्यापासून वाढणार

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. नाशिकमधील सुरगाना येथे सर्वाधिक १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. पावसाला पोषक हवामान हाेत असल्याने उद्यापासून कोकणात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  शनिवारी सकाळपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला होता. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. रत्नागिरीतील राजापूर, भांबेड, विलवडे, नाशिकमधील सुरगाणा, मानखेड, नाणशी, कोशिंबे, जागमोडी येथे १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप होती. रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामानासह उन्ह सावल्यांचा खेळ सुरू होता.  बांग्लादेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जम्मू काश्‍मिरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे कोकणात पाऊस पडत असून, मंगळवारपासून विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.  कोकण : कर्जत ४३, कडाव ४२, खालापूर चौक ३२, कोपरोली ४५, उरण ३३, आटोणे ३१, असुर्डे ४०, पेण ३०, कामर्ली ३३, इंदापूर ३०, म्हसळा ३०, खामगाव ३८, चिपळुण ३५, खेरडी ६५, मार्गतम्हाणे ६०, रामपूर ६५, सावर्डे ६६, कळकवणे ६३, शिरगाव ८२, दापोली ४०, बुरोंडी ३५, दाभोळ ४५, अंजर्ला ३०, वाकवली ४८, पालगड ३८, वेलवी ४२, खेड ३०, भारने ४२, तलवली ४४, पटपन्हाळे ३३, अबलोली ३५, रत्नागिरी ४६, कोटवडे ६२, तरवल ३५, पाली ४१, देवरुख ५३, राजापूर १०७, सवंडल ८३, कोंडीया ४७, कुंभवडे ५७, नाटे, ओणी ५४, पाचल ४७, लांजा ५३, भांबेड १०१, पुनस ४२, सातवली ३८, विलवडे १३५, पाटगाव ३४, भेडशी ३०, साखर ४६. मध्य महाराष्ट्र : डांगसौदाणे ३३, मुल्हेर ३४, कळवण ३९, मोकभांगी ३४, कानशी ५५, दालवत ६०, अभोणा ५७, उभेरठाणा ९०, बाऱ्हे ११८, बोरगाव १४०, मानखेड १४६, सुरगाना १५२, उमराळे ३९, नाणशी १३७, कोशिंबे, १११ कसबेवणी ६२, वरखेडा ३५, धारगाव ३०,  पेठ ६१, जागमोडी १०४, हेळवाक ५८, मरळी ३७, महाबळेश्‍वर ६०, कोरेगाव ७०, शिराळा ३७, चरण ४२, बाजार ४१, करंजफेन ४७, मलकापूर ३९, आंबा ६३, राधानगरी ८१, सरवडे ४३, आवळी ३३, कसबा ४२, गगनबावडा ५८, साळवण ९७, शिरोली-दुमाला ४२, सिद्धनेर्ली ४८, केनवडे ३०, बिद्री ३१, कडेगाव ६०, कराडवाडी ५५, गवसे ४२, हेरे ३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com