agriculture news in marathi, weather, monsoon withdraws from maharashtra | Agrowon

महाराष्ट्रातून मॉन्सून परतला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रातून परतला आहे. २४ तासांमध्ये मॉन्सून संपूर्ण देशातून बाहेर पडण्यास पोषकस्थिती असल्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात अाली. १३९ दिवसांच्या मुक्कामानंतर मॉन्सून महाराष्ट्रातून परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी (ता.२४) जाहीर केले. १४ मे रोजी पश्‍चिम बंगालमध्ये दाखल झालेला मॉन्सून, महाराष्ट्रात ७ जूनला दाखल हाेऊन, २० जूनला महाराष्ट्र व्यापला हाेता.

पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रातून परतला आहे. २४ तासांमध्ये मॉन्सून संपूर्ण देशातून बाहेर पडण्यास पोषकस्थिती असल्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात अाली. १३९ दिवसांच्या मुक्कामानंतर मॉन्सून महाराष्ट्रातून परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी (ता.२४) जाहीर केले. १४ मे रोजी पश्‍चिम बंगालमध्ये दाखल झालेला मॉन्सून, महाराष्ट्रात ७ जूनला दाखल हाेऊन, २० जूनला महाराष्ट्र व्यापला हाेता.

महाराष्ट्राबराेबर ईशान्य भारत, बंगालच्या उपसागराचा काही भाग, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा आणि अरबी समुद्राच्या काही भागातून मॉन्सून परतलल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी (२०१६) १५ आॅक्टाेबरला, तर २०१५ मध्ये १८ आॅक्टाेबरला मॉन्सून राज्यातून परतला हाेता.  दरम्यान, मॉन्सून परतल्यानंतर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी हाेऊन राज्याच्या विविध भागांतील किमान तापमानात घट झाली असून, थंडी पडण्यास सुरवात झाली आहे. राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. राज्यात मंगळवार (ता.२४) च्या गेल्या २४ तासांत महाबळेश्‍वर येथे किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस नाेंद झाली. तर मुंबईत २४.५ आणि पुण्यात १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. 

येत्या २४ तासांत गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील ४८ तासांत गुरुवार (ता. २६) काेकण गाेवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. २७) गाेव्यासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता, तर शनिवारी (ता. २८) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, काेकण गाेवा व विदर्भात हवामान काेरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...