agriculture news in marathi, weather, North Maharashtra, Marathwada, Vidharbha temperature rise above forthy | Agrowon

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पारा चाळिशीपार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपार गेला आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १७) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपार गेला आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १७) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात सायंकाळी ढगाळ हवामान होत असले तरी दुपारपर्यंत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. मालेगावसह जळगाव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ४० अंशांवर पोचले आहे. पश्‍चिम राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून नैर्ऋत्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, दोन दिवस पावसाची शक्यता आहे. 

रविवार (ता.१५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर ३३.२, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.६, सांगली ३८.४, सातारा ३८.४, सोलापूर ३९.८, मुंबई ३२.५, अलिबाग ३१.५, रत्नागिरी ३३.४, डहाणू ३४.०, आैरंगाबाद ३९.०, परभणी ४१.७, नांदेड ४०.०, अकोला ४१.५, अमरावती ४०.८, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४०.३, गोंदिया ३७.६, नागपूर ३९.७, वर्धा ४०.५, यवतमाळ ४०.५.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...