agriculture news in marathi, weather prediction, Chandrapur faces heatwave | Agrowon

चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन वाढतच आहे. उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र अक्षरश: भाजून निघाला आहे. चंद्रपूर येथे उच्चांकी ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जगातील सर्वांत उष्ण ठिकाणांमध्ये चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर हाेते. तर पहिल्या दहा ठिकाणांमध्ये चंद्रपूरसह विदर्भातील गोंदिया, अकोला, वर्धा, मराठवाड्यातील परभणीचा समावेश असल्याचे अलडोरॅडो वेदर या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन वाढतच आहे. उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र अक्षरश: भाजून निघाला आहे. चंद्रपूर येथे उच्चांकी ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जगातील सर्वांत उष्ण ठिकाणांमध्ये चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर हाेते. तर पहिल्या दहा ठिकाणांमध्ये चंद्रपूरसह विदर्भातील गोंदिया, अकोला, वर्धा, मराठवाड्यातील परभणीचा समावेश असल्याचे अलडोरॅडो वेदर या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे. 

मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. २७ मार्च रोजी भिरा येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर यथे ४५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत हंगामातील उच्चांक नोंदला गेला. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान ४२ अशांच्या पुढे गेले आहे. अकोला, गेंदिया, वर्धामध्ये पारा ४४ अंशांवर गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद, परभणी, बीड येथे तापमान ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

कोकणात तापमान ३३ ते ३५ अंशांच्या असपास आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी ३७ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. राज्यात सध्या मुख्यत: कोरडे हवामान आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून, विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार असून, तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मंगळवारी (ता. २४) विदर्भ मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी (ता.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.७, जळगाव ४२.८, कोल्हापूर ३७.७, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.२, सांगली ४०.४, सातारा ४०.१, सोलापूर ४२.२, मुंबई (सांतक्रूझ) ३५.२, अलिबाग ३२.७, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३५.९, आैरंगाबाद ४०.१, परभणी ४३.८, अकोला ४४.०, अमरावती ४३.०, बुलडाणा ४१.०, चंद्रपूर ४५.३, गोंदिया ४४.४, नागपूर ४२.२, वर्धा ४४.०, यवतमाळ ४३.०.

इतर अॅग्रो विशेष
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...