agriculture news in marathi, weather prediction, chandrapur heats highest temperature | Agrowon

‘चंद्र’पूर तापलेलेच ! ४५.९ अंश तापमान
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

पुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येेथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे पारा ४४ अशांवर होता. मंगळवारपर्यंत (ता. २४) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, पूर्व विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

पुणे : उन्हाची ताप वाढल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येेथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे पारा ४४ अशांवर होता. मंगळवारपर्यंत (ता. २४) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून, पूर्व विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन वाढल्याने गेल्या आठवडाभरात तापमान पारा सातत्याने वर जात आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने चंद्रपूर जगातील उष्ण ठिकाणी ठरले आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी येथे ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमानात एक ते दान अंशांची घट झाली होती. तर पूर्व विदर्भात तापमानातील वाढ कायम होती. राज्यात सध्या कोरडे हवामान असून, रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. 

शनिवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८, नगर ४०.२, जळगाव ४२.०, कोल्हापूर ३५.०, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ४१.४, नाशिक ३६.३, सांगली ३८.६, सातारा ३७.१, सोलापूर ४०.७, मुंबई (सांतक्रूझ) ३४.२, अलिबाग ३५.६, रत्नागिरी ३३.३, डहाणू ३६.३, आैरंगाबाद ३९.०, परभणी ४३.०, अकोला ४२.६, अमरावती ४१.८, बुलडाणा ३९.५, चंद्रपूर ४५.९, गोंदिया ४२.०, नागपूर ४४.२, वर्धा ४४.०, यवतमाळ ४२.५.

इतर अॅग्रो विशेष
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...