agriculture news in marathi, weather prediction, depression over southeast Arabian sea moved north­northwestwards | Agrowon

अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाचे संकेत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात मंगळवारी (ता. १३) सकाळी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे गुरुवारपर्यंतच्या ४८ तासांमध्ये कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डीप्रेशन) रूपांतर होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याने मंगळवारी दुपारी राज्यात ढगाळ हवामान तयार होऊ लागले अाहे. गुरुवारपासून राज्यात पावसाची शक्यता असून, शुक्रवार आणि शनिवारी सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात मंगळवारी (ता. १३) सकाळी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे गुरुवारपर्यंतच्या ४८ तासांमध्ये कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डीप्रेशन) रूपांतर होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याने मंगळवारी दुपारी राज्यात ढगाळ हवामान तयार होऊ लागले अाहे. गुरुवारपासून राज्यात पावसाची शक्यता असून, शुक्रवार आणि शनिवारी सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंका अाणि मालदीवलगत ठळक झाले. त्यानंतर वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता आणखी वाढतच आहे. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अग्नेय अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. मिनिकाॅय बेटांच्या अग्नेयेकडे ४८० किलोमीटर, थिरुअनंतपुरमपासून नैऋत्येकडे ३९० किलोमीटर आणि मालदिवच्या मालेपासून इशान्येकडे २९० किलोमीटर अंतरावर होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेला कमी दाबाचा पट्टा कर्नाटक किनाऱ्यापर्यंत विस्तारला होता. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली होती. यामुळे राज्यात ढगाळ हवामान तयार होत असून, पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे देशातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे विदर्भात कमी झालेले तापमान पुन्हा वाढले अाहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांच्या वर सरकला आहे. गुरुवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने राज्याचे कमाल तापमान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

मंगळवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३६.०, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ३८.६, नाशिक ३६.२, सांगली ३६.३, सातारा ३७.५, सोलापूर ३७.६, मुंबई ३३.२, अलिबाग ३२.८, रत्नागिरी ३६.४, डहाणू ३१.२, भिरा ४२.०, औरंगाबाद ३५.६, परभणी ३७.४, नांदेड ३६.५, अकोला ३७.६, अमरावती ३६.४, बुलडाणा ३६.२, ब्रह्मपुरी ३८.१, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ३६.२, नागपूर ३७.०, वर्धा ३७.८, यवतमाळ ३६.०.

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...