agriculture news in marathi, weather prediction, heatwave alert in vidharbha | Agrowon

उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. सोमवारपासून (ता.२३) राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, गुरुवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. रविवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली होती. 

पुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. सोमवारपासून (ता.२३) राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, गुरुवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. रविवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली होती. 

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उन्हाचा चटका कायम असून, उर्वरित महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणीसह विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. उद्यापासून महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्ये तापमानत वाढ होणार असून, तेलंगण, रायलसिमा, अांध्र प्रदेशात तापमान ४० अंशांच्या जवळपास राहील; तर शुक्रवारी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता.२२) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.५, नगर ४१.१, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३८.९, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.३, सांगली ४०.८, सातारा ३९.६, सोलापूर ४२.१, मुंबई (सांतक्रूझ) ३३.७, अलिबाग ३२.२, रत्नागिरी ३४.७, डहाणू ३३.३, आैरंगाबाद ३९.१, परभणी ४२.९, अकोला ४२.६, अमरावती ४१.४, बुलडाणा ४२.८, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.०, नागपूर ४२.९, वर्धा ४२.९, यवतमाळ ४२.०.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...