agriculture news in marathi, weather prediction, latur, nanded and kolhapur had rain | Agrowon

लातूर, नांदेड, कोल्हापूरमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018

पुणे : उन्हाचा चटका वाढला असतानाच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर जिल्ह्यांत रविवारी (ता. ६) पावसाचे ढग गोळा झाले होते. दुपारनंतर उकाड्यात वाढ हाेऊन लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, नांदेडमधील मुखेड, बिलोली, धर्माबाद, कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पूर्वमाेसमी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

पुणे : उन्हाचा चटका वाढला असतानाच लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर जिल्ह्यांत रविवारी (ता. ६) पावसाचे ढग गोळा झाले होते. दुपारनंतर उकाड्यात वाढ हाेऊन लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, नांदेडमधील मुखेड, बिलोली, धर्माबाद, कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पूर्वमाेसमी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच तापमानात वाढ झाल्याने राज्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबादसह पुणे, नगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, वाशिम जिल्ह्याच्या काही भागांत दुपारनंतर ढग गोळा झाले होते. नांदेड जिल्ह्यातील सागरोळी (ता. बिलोली) परिसरात धर्माबाद तालुक्याच्या काही भागात, तसेच लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील किल्लारी परिसरात पाऊस पडला. 

कोल्हापूरमधील आजरा, चंदगड, भुदरगड, कागल, गडहिंग्लज, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यात दाट ढग गोळा झाले होते.  विदर्भात दोन दिवस वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली होती. सातत्याने हंगामातील उच्चांकी पातळीवर असलेल्या चंद्रपूर आणि नागपूर येथे शुक्रवारी (ता. ४) तापमान ४० अंशांच्या खाली उतरले होते. विदर्भ, मराठवाड्यातही तापमानाचा पारा काहीसा घसरला होता. रविवारी (ता. ६) तापमानात पुन्हा वाढ होत विदर्भ, मराठवाड्यात तापमान ४३ अंशांच्या वर गेले आहे. अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.६, नगर ४२.६, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३४.५, मालेगाव ४३.६, नाशिक ३८.७, सांगली ३९.८, सातारा ४०.१, सोलापूर ४२.७, मुंबई ३४.०, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३४.८, औरंगाबाद ४०.८, परभणी ४३.५६, नांदेड ४२.५, उस्मानाबाद ४१.५, अकोला ४४.२, अमरावती ४२.८, बुलडाणा ४१.१, चंद्रपूर ४५.०, गोंदिया ४४.१, नागपूर ४४.०, वर्धा ४४.०, यवतमाळ ४४.०.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...