विदर्भात अाज अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात अाज अतिवृष्टीचा इशारा
विदर्भात अाज अतिवृष्टीचा इशारा

पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र ठळक झाल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. मंगळवारी (ता. ७) पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात दाट ढग जमा झाले होते. आज (ता. ८) विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मंगळवारी सकाळपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. दुपारी उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात ढगांची दाटी झाली होती. बंगालच्या उपसागरात सोमवारी (ता. ६) तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी (ता. ७) ठळक झाले होते. बुधवारपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात जोरदार पाऊस पडणार अाहे; तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याला बळकटी मिळणार असल्याने पश्‍चिम किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही मॉन्सून सक्रिय होऊन पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये शिरगाव, आंबोणे, दावडी, ताम्हिणी, भिरा, वळवण, शिरोटा, काेयना नवजा, कोकणातील लांजा, दोडामार्ग, कणकवली, कर्जत, मडगाव, माथेरान, म्हसळा, मुलदे, मरबाड, राजापूर, रोहा, सांगे, सावंतवाउी, तलासरी, मध्य महाराष्ट्रातील शिराळा, चंदगड, लोणावळा, महाबळेश्‍वर, राधानगरी, गगनबावडा, इगतपुरी, मुल्हेर, पौड, शाहूवाडी येथे हलका ते मध्यम पाऊस पावसाने हजेरी लावल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com