पूर्व विदर्भात ढगांची दाटी; तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : आेडिशा आणि परिसरावरील तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात ढगांची दाटी झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. गुरुवारी (ता. ९) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, त्याची तीव्रता कमी होत आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पश्‍चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात ढगाळ हवामान असले, तरी कोकण, दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अनेक भागांत पावसाची उघडीप आहे. उत्तर महाराष्ट्रातही दुपारनंतर ढगाळ हवामान होते.

पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोलीसह पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला असला, तरी बहुतांशी भागात पावसाची मुख्यत: उघडीप होती.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस  (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग) ः कोकण : वाहल २१, दाभोळ २०, वेळवी २१, अबलोली २५, म्हाप्रळ २३, तरवल २७, सवंडल २३, भेडशी २२.मध्य महाराष्ट्र : माले २१, मुठे २९, बामणोली २८, हेळवाक २९, मरळी २१, महाबळेश्‍वर ४३, तापोळा ३४, लामज ४७, करंजफेण २८, अांबा ६५, राधानगरी ४०, कसबा २५, साळवण ३२, कराडवाडी २०.विदर्भ : केंद्री ३८, नाकडोंगरी ३१, पोहारा ३९, लाखनी २८, गडचिरोली २८, पिसेवढथा २३, घोट २०, सिरोंचा ६७, बामणी ४२, पेंटीपका ६६, असारळी ३०, जिमलगट्टा ५३, पेरमिली ३०, गाट्टा २४, चाटेगाव २८, पेंढरी २५, भामरागड ५२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com