agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह होताहेत कमी-अधिक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जानेवारी 2019

पुणे  ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रवाह कमी -अधिक होत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात बदल होत असून थंडीचा कडाका कमी होत आहे. शुक्रवारी (ता.११) धुळ्यातील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

पुणे  ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रवाह कमी -अधिक होत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात बदल होत असून थंडीचा कडाका कमी होत आहे. शुक्रवारी (ता.११) धुळ्यातील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानाचा तीन अंशांपर्यंत आला होता. मात्र, आता राज्यातील थंडीची लाट ओसरू लागली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत कमी होऊ लागला आहे. विदर्भातील नागपूर व मध्य महाराष्ट्रातील नगर येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले आहे. शुक्रवारी निफाड, नगर, नागपूर, पुणे, जळगाव, नाशिक येथील किमान तापमान दहा अंशाखाली होते. गुरुवारपासून या भागातील किमान तापमान एक ते दोन अंशाने वाढत असले तरी अजून काही दिवस या भागात बोचरी थंडी कायम राहणार आहे.  

कोकणातही किमान तापमानाचा पारा १४ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. डहाणूमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर या प्रमुख शहारांचा पारा दहा अंशांवर गेला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद असून थंडी काहीशी कमी झाली आहे. विदर्भातही यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा या भागातील तापमान दहा ते बारा अंशाच्या दरम्यान आहे. येत्या मंगळवारपर्यंत (ता.१५) राज्यात हवामान कोरडे राहील. आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) पुणे परिसरात संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे या भागातील थंडी कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी (ता.११) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रुझ) १५.४ (-१), अलिबाग १६.५ (-१), रत्नागिरी १७.५ (-१), डहाणू १४.६ (-२), पुणे ९.७ (-१), जळगाव ७.६ (-४), नगर ७.१ (-५), कोल्हापूर १४.७, महाबळेश्वर १४.६ (१), मालेगाव १०.१, नाशिक ८.४ (-२), निफाड ६.२, सांगली ११.३ (-२), सातारा ११.६ (-१), सोलापूर १६.२, औरंगाबाद १०.४ (-१), परभणी ११.५ (-३), उस्मानाबाद १२.९, नांदेड १३.५, अकोला १०.९ (-३), अमरावती ११.६ (-३), बुलढाणा १२.६ (-२), चंद्रपूर ११.२ (-३), गोंदिया १०.० (-३), नागपूर ८.२ (-५), वर्धा १०.८ (-२), यवतमाळ १२.० (-३)

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...