संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज

पुणे  ः विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट कायम आहे. बुधवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत देशातील उच्चांकी तापमानाची नोंद विदर्भातील चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस झाली. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही भागांत असलेली उष्णतेची लाट अजूनही तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या अंदमान, निकोबार बेटसमूह आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. १८ किंवा १९ मेपर्यंत  अंदमानात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा व परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र ते कोमोरीन परिसर व कर्नाटक परिसर, तमिळनाडू या भागात समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे; तर विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यात ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. खानदेशातही उन्हाचा चटका कायम असून, मध्य महाराष्ट्र व कोकणात तापमान सरासरीच्या दरम्यान आहे. 

बुधवार (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.२ (१.७), जळगाव ४२.० (-०.७), कोल्हापूर ३६.५ (०.३), महाबळेश्‍वर ३२.८ (१.९), मालेगाव ४१.४ (०.६), नाशिक ३७.८ (-०.५), सांगली ३९.० (१.५), सातारा ३९.० (२.४), सोलापूर ४२.१ (१.४), मुंबई (सांताक्रुझ) ३३.३ (-०.१), मुंबई ३३.५, अलिबाग ३३.० (०.१), रत्नागिरी ३३.२ (०.४), डहाणू ३४.६ (०.५), औरंगाबाद ४०.४ (०.६), बीड ४२.१ (१.७), परभणी ४३.७ (१.७), नांदेड ४२.५ (०.६), अकोला ४३.१ (०.९), अमरावती ४३.२ (०.८), बुलडाणा ४०.५ (२.१) ब्रह्मपुरी ४४.९ (३.२), चंद्रपूर ४५.२ (२.६), गोंदिया ४२.० (०.३), नागपूर ४४.० (१.८), वाशीम ४२.०, वर्धा ४४.२ (१.५) यवतमाळ ४१.८ (०.१). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com