ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. आजपासून (ता.१८) कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

‘वायू’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने मॉन्सूनचे आगमन लांबले. यातच मृग नक्षत्राच्या प्रारंभालाच राज्यात चांगली हजेरी लावलेल्या पूर्वमोसमीच्या सरी थांबल्या. मराठवाडा, विदर्भात आकाश निरभ्र होत तापमानाचा पारा चढल्याने उष्ण लाट आली. चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर हवामान पूर्ववत होण्यासाठी अजून चार ते पाच कालावधी लागणार आहे. या काळात राज्यात ढगाळ हवामानसह उन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. २२) मृग नक्षत्र संपून सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत आहे. 

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, मराठवाडातही लाटेची स्थिती कायम आहे. सोमवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेड येथे उष्ण लाट आली होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमान ४० अंशांच्या खाली, तर कोकणात ३४ अंशांच्या खाली आहे. 

सोमवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.८ (२.७), जळगाव ४०.० (२.५), कोल्हापूर ३२.८(३.८), महाबळेश्वर २२.६ (०.५), मालेगाव ३९.० (३.९), नाशिक ३३.२ (०.५), सांगली ३३.५ (२.९), सातारा ३२.१ (२.६), सोलापूर ३७.० (३.२), अलिबाग ३२.२ (१.१), डहाणू ३३.५ (१.०), सांताक्रूझ ३४.२ (२.३), रत्नागिरी ३२.३ (२.४), औरंगाबाद ३७.२ (३.७), परभणी ४०.० (४.७), नांदेड ४२.० (५.६), अकोला ४०.४ (३.५), अमरावती ३९.२ (२.३), बुलडाणा ३७.७ (४.४), ब्रह्मपुरी ४३.९ (७.०), चंद्रपूर ४३.४(६.३), गोंदिया ४२.८(५.२), नागपूर ४२.० (४.६), वाशीम ३९.८, वर्धा ४१.० (४.१), यवतमाळ ४१.०(५.०). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com