agriculture news in marathi, weather prediction, Rain prediction from thrusday | Agrowon

राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 मार्च 2018

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कमी दबाचा पट्टा पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील कमी दबाचा पट्टा पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकणातील भिरा येथे उष्णतेची लाट आली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात श्रीलंका, कोमोरीन आणि मालदीव बेटांलगत ठळक कमी दबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्टीलगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची; तसेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रादरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, मध्य महाराष्ट्रातील चक्राकार वाऱ्याची स्थिती यात मिसळून गेली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने गुरुवारी (दि.१५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे; तर शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात हलका पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

सूर्य तळपू लागल्याने राज्यात दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात रात्रीच्या (किमान) तापमानात मोठी वाढ झाली;. तर ढगाळ हवामान, वादळी पावसामुळे विदर्भातील दिवसाचे तापमान घटल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात कमाल तापमान ३६ अंश; तर कोकणात अनेक ठिकाणी पारा ३४ अंशांच्या वर गेला आहे. विदर्भात मात्र कमाल तापमान ३२ ते ३५ अंशांच्या जवळपास असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ७ अंशांनी घट झाली.
सोमवारी (दि. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१, जळगाव ३७.०, कोल्हापूर ३६.०, महाबळेश्वर ३१.३, मालेगाव ३७.४, नाशिक ३६.३, सातारा ३७.०, सोलापूर ३८.३, मुंबई ३४.८, अलिबाग ३४.६, रत्नागिरी ३४.७, डहाणू ३३.६, भिरा ४२.०, औरंगाबाद ३४.६, परभणी ३६.९, नांदेड ३८.०, अकोला ३१.०, अमरावती ३०.८, बुलडाणा ३५.२, ब्रह्मपुरी ३२.९, चंद्रपूर ३४.०, गोंदिया ३५.०, नागपूर ३५.०, वर्धा ३२.०, यवतमाळ २७.५.
अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये 

रविवार ठरला थंड दिवस
राज्यात उन्हाचा ताप वाढत असतानाच, विदर्भात रविवारी (दि. ११) असलेल्या ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली होती. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये रविवारचा दिवस थंड ठरला. रात्रीचे तापमान १० अंशांपेक्षा अधिक असेल आणि दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी घट झाल्यास तो दिवस थंड मानला जातो; तसेच कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तो दिवस अतिथंड ठरतो. रविवारी यवतमाळ येथे दिवसाच्या तापमानात ७.७ अंशांनी घट होता राज्यातील दिवसभराचे सर्वांत कमी २७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. अकोला येथे ४ मिलिमीटर; तर यवतमाळमध्ये ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

इतर अॅग्रो विशेष
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...
सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...
तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...
‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...
अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...
समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...
स्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...