agriculture news in marathi, weather prediction, Rain prediction from thrusday | Agrowon

राज्यात आजपासून पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे : अरबी समुद्रातीन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे गुरुवारपासून (ता. १५) राज्यात पावसाची शक्यता अाहे. तर रविवारपर्यंत (ता. १८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी राज्यात ढगाळ हवामान तयार झाल्याने अनेक ठिकाणी दुपारपासून अंधारून आले होते.

पुणे : अरबी समुद्रातीन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे गुरुवारपासून (ता. १५) राज्यात पावसाची शक्यता अाहे. तर रविवारपर्यंत (ता. १८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी राज्यात ढगाळ हवामान तयार झाल्याने अनेक ठिकाणी दुपारपासून अंधारून आले होते.

अरबी समुद्रात असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मिनिकाॅय बेटांपासून अग्नेय दिशेला १३० किलाेमीटर, तर तिरुअनंतपुरमच्या नैर्ऋत्य दिशेला ३४० किलोमीटर अंतरावर होते. ताशी १४ किलाेमीटर वेगाने वायव्येकडे सरकणारे क्षेत्राची तीव्रता गुरुवारपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर ते निवळत जणाार आहे. अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाची शक्यताही मावळली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी दुपारनंतर असलेल्या ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाची ताप कमी झाली होती. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस पडणार असून, शुक्रवारपासून राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.३, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ३९.०, नाशिक ३६.५, सांगली ३७.०, सातारा ३५.७, सोलापूर ३८.४, मुंबई ३३.३, रत्नागिरी ३५.८, डहाणू ३२.७, भिरा ४१.०, औरंगाबाद ३६.६, परभणी ३८.४, नांदेड ३७.०, अकोला ३८.६, अमरावती ३७.६, बुलडाणा ३८.०, चंद्रपूर ३८.६, गोंदिया ३७.२, नागपूर ३८.५, वर्धा ३९.०, यवतमाळ ३७.५.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...