agriculture news in Marathi, weather prediction, Rain till sunday in Konkan and Goa | Agrowon

सोमवारनंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे : रविवार (ता. २०)पर्यंत दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवार (ता. २१) नंतर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

पुणे : रविवार (ता. २०)पर्यंत दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवार (ता. २१) नंतर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   

दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी आज (ता.१८) मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. गुरुवारी (ता. १७) चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याने उन्हाचा चटका कायम आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा एक अंश सेल्सिअसने घसरला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानाचा पारा कमी होऊन ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी सकाळपासून उकाड्यात वाढ होत आहे.

बुधवारी (ता. १७) दुपारनंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी अचानक ढग भरून आले. ढगांनी एकत्रित दाटी करत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला, त्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. तर आंबा, डाळिंब, भाजीपाला पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.  

गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान  (अंश सेल्सिअस)  : मुंबई ३४.२,  सांताक्रूझ ३४.१, रत्नागिरी ३५.०, पुणे ३९.८, नगर ४२.७, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३७.९, महाबळेश्वर ३२.७, मालेगाव ४२.८, नाशिक ३८.८, सांगली ३४.६, सातारा ३९.५, सोलापूर ४०.६, औरंगाबाद ४१.४, परभणी शहर ४४.१, नांदेड ४२.५, अकोला ४४.१, अमरावती ४३.८, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४५.१, चंद्रपूर ४५.२, गोंदिया ४२.०, नागपूर ४२.२, वाशीम ४२.८, वर्धा ४४.९, यवतमाळ ४३.५.

अदेनच्या खाडीत ‘सागर’ चक्रीवादळ
अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाची तीव्रता वाढून अदेनच्या खाडीत गुरुवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजता ‘सागर’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे चक्रवादळ येमेनपासून ४०० किलोमीटर ईशान्येकडे तर सोकोट्रापासून ५६० किलोमीटर वायव्येकडे होते. अदेनच्या खाडीत ताशी ६५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १८) पहाटे या चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...