मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढणार
मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढणार

पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने राज्यात बुधवारपर्यंत (ता.८) पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. आजपासून (ता.७) कोकणात काही ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता.६) राज्यात ढगाळ हवामान तयार झाले होते. दुपारनंतर पूर्व विदर्भात ढगांची दाटी झाली होती.

कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हा अपवाद वगळता आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. बंगालच्या उपसागरात सोमवारी (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यापासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. नैऋत्येकडे झुकलेल्या या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, या प्रणालीमुळे अरबी समुद्रावरून येणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांना बळकटी मिळणार असल्याने पश्‍चिम किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर कोयना नवजा येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिरगाव, आंबोणे, ताम्हिणी येथे मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर, कोकणातील दोडामार्ग, म्हसळा, वैभववाडी, चिपळूण, लांजा, माथेरान, राजापूर, सावंतवाडी, मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्‍वर, पेठ, शाहूवाडी  येथे हलका ते मध्यम पाऊस पावसाने हजेरी लावल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com