agriculture news in marathi, weather prediction, scattered rain fall in state today | Agrowon

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे : राज्यात आजपासून कोकण, गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

पुणे : राज्यात आजपासून कोकण, गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेला तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी हा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. त्यामुळे विदर्भात अजून दोन ते चार दिवस उन्हाची तीव्रता राहणार असून, पुढील आठवड्यात हा पारा कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासापर्यंत विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४७.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मरावाड्यातील बहुतांशी ठिकाणांचा पारा चाळिशीच्या खाली उतरला आहे. 

राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या माॅन्सूनच्या आगमनामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहे. कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान होत आहे. येत्या चार जूनपर्यंत राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. 

गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई ३५.०, सांताक्रूझ ३५.०, अलिबाग ३६.७, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३६.६, पुणे ३५.८, नगर ४१.६, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३४.६, महाबळेश्वर २९.१, मालेगाव ४२.२, नाशिक ३६.७, सांगली ३५.६, सातारा ३४.६, सोलापूर ३९.२, औरंगाबाद ३९.८, उस्मानाबाद ३८.५, परभणी शहर ४२.९, नांदेड ४१.५, अकोला ४३.०, अमरावती ४३.४, बुलढाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४६.९, चंद्रपूर ४७.९, गोंदिया ४४.५, नागपूर ४६.३, वर्धा ४५.७, यवतमाळ ४४.५.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...