विदर्भात उष्णतेची लाट, तापमान वाढणार

विदर्भात उष्णतेची लाट, तापमान वाढणार
विदर्भात उष्णतेची लाट, तापमान वाढणार

पुणे : उष्णतेच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या आहेत. राज्यातील सतरा शहरांचा पारा चाळिशीपार गेला आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता.२६) सकाळी चंद्रपूर येथे ४४.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येत्या आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहणार आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यावर होणार असून, येथील तापमानात आणखी किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता सकाळपासून वाढत आहे. दुपारचा कमाल तापमानाचा पारा ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सायंकाळी पुन्हा हा पारा कमी होईल. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही चढउतार सुरू आहे. मध्यरात्रीनंतर हवेत किंचितसा गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात किंचित घट होत आहे. पुण्यात १७.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भातील बुलडाणा येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान ४१.० अंश सेल्सिअसवर होते. नगर, लोहगाव, अकोला, ब्रह्ममुरी, चंद्रपूर येथील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील लोहगाव, नगर, जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ येथील पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू येथील तापमान चाळिशीच्या आत होते. गुरुवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपयर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) ३४.४, अलिबाग ३२.८, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३४.४, पुणे ३९.१, नगर ४२.२, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४३.०, नाशिक ३८.५, सांगली ३९.८, सातारा ३८.८, सोलापूर ४२.१, औरंगाबाद ४०.०, परभणी शहर ४३.०, उस्मानाबाद ४१.०, अकोला ४३.५, अमरावती ४२.२, बुलडाणा ४१.०, ब्रह्मपुरी ४३.४, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.७, वाशीम ४१.८, वर्धा ४२.५, यवतमाळ ४२.० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com