अवकाळी पावसाचे पुन्हा सावट

अवकाळी पावसाचे पुन्हा सावट
अवकाळी पावसाचे पुन्हा सावट

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र प्रभाव कमी होत नाही, तोच बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या परिसरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. रविवार (ता.१५) पासून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचबरोबर बाष्पही या भागावरून वाहत होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जोरदार वारा वाहून मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला. मात्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला नाही. आता पुन्हा अवकाळी पावसासाठी हवामान तयार होत आहे. राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे.  आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहिल. रविवारी (ता.१५) आणि सोमवारी (ता.१६) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूर येथे ४०.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.  गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान  (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) ३४.६, अलिबाग ३३.६, रत्नागिरी ३४.८, डहाणू ३६.८, पुणे ३७.३, नगर ३९, जळगाव ४०.२, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४०.४,  नाशिक ३७.५, सांगली ३७.४, सातारा ३७.३, सोलापूर ३८.४, औरंगाबाद ३६.८, परभणी शहर ३९.४, नांदेड ३८.५, अकोला ३९.४, अमरावती ३७.६, बुलढाणा ३८.२, ब्रह्मपुरी ३९.८, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ३७.८, नागपूर ३७.७, वाशीम ३७, वर्धा ३८, यवतमाळ ३६   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com