agriculture news in marathi, weather, Rain prediction form Thursday in maharashtra | Agrowon

राज्यात गुरुवारपासून पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे : तापमानात झालेल्या वाढीनंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. गुरुवारपासून (ता. ५) राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम अाहे. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली होती. 

पुणे : तापमानात झालेल्या वाढीनंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. गुरुवारपासून (ता. ५) राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम अाहे. चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली होती. 

मध्य प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून विदर्भ, कर्नाटक, तमिळनाडू आणि कोमोरीन भागांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पपुरवठा होत असल्याने पूर्व किनाऱ्यावरील राज्यांमध्ये ढगाळ हवामान आहे. रविवारी दुपारनंतर विदर्भातही तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ होते. बुधवारी (ता. ४) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारपासून राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वाढलेली उन्हाची ताप कायम होती. विदर्भात चंद्रपूर, मध्य महाराष्ट्रात जळगाव, मराठवाड्यात परभणी येथे उच्चांकी तापमान नोंदले गेले. याशिवाय मालेगाव, सोलापूर, भिरा, नांदेड, अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे पारा ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. बुधवारपर्यंत (ता. ४) पूर्व भारतासह विदर्भात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

रविवार (ता. १) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.५, जळगाव ४२.०, कोल्हापूर ३७.३, महाबळेश्वर ३२.०, मालेगाव ४१.६, नाशिक ३७.०, सांगली ३७.८, सातारा ३७.७, सोलापूर ४०.३, मुंबई ३२.०, अलिबाग ३४.२, रत्नागिरी ३२.०, डहाणू ३३.६, भिरा ४०.०, आैरंगाबाद ३९.३, परभणी ४२.२, नांदेड ४२.०, अकोला ४२.५, अमरावती ४१.६, बुलडाणा ३९.५, चंद्रपूर ४२.८, गोंदिया ४०.५, नागपूर ४१.६, वर्धा ४२.५, यवतमाळ ४१.५.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...