agriculture news in marathi, weather, rain prediction from Thursday in state | Agrowon

गुरुवारपासून पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 मे 2018

पुणे : उन्हाचा ताप वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, कोकणात पूर्वमोसमीच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच असून, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे : उन्हाचा ताप वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, कोकणात पूर्वमोसमीच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच असून, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

रविवारी राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस पडला होता. तसेच राज्यात वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे, तसेच ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहेत. मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भासह राज्यातील बहुतांशी भागाच्या तापमानात थोडीशी घट झाली होती. मात्र तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत वरच असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

उत्तर भारतात धुळीच्या वादळासह पावसाने हजेरी लावली आहे. तर पंजाबपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) असल्याने राज्यातही वाऱ्याचा वेग वाढला आहे. ही द्राणीय स्थिती मंगळवारी पूर्व उत्तर प्रदेशापासून विदर्भातपर्यंत होती. पूर्वेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू दरम्यानही हवेची द्रोणीय स्थिती सक्रीय असून, अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांसह महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   

मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४, नगर ४२.१, जळगाव ४२.०, कोल्हापूर ३५.८, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४२.२, नाशिक ३७.०, सांगली ३६.३, सातारा ३९.६, सोलापूर ४१.३, मुंबई ३४.५, अलिबाग ३५.६, रत्नागिरी ३४.३, डहाणू ३६.२, औरंगाबाद ४०.३, परभणी ४३.८, अकोला ४३.१, अमरावती ४३.६, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४५.१, चंद्रपूर ४४.८, गोंदिया ४३.५, नागपूर ४४.५, वर्धा ४४.५, यवतमाळ ४३.५.
 

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...