agriculture news in marathi, weather, rain prediction today in state | Agrowon

ढगाळ हवामान, आजही पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. दाेन दिवसांपासून असलेल्या ढगांच्या अच्छादनामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन न झाल्याने कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे. गेले काही दिवस तापमान उच्चांकी ४२ अंशांवर पोचलेल्या भिरा येथे पारा तब्बल १० अंशांनी उतरून ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शनिवारी (ता. १७) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर रविवारपासून कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

पुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. दाेन दिवसांपासून असलेल्या ढगांच्या अच्छादनामुळे अनेक ठिकाणी सूर्यदर्शन न झाल्याने कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे. गेले काही दिवस तापमान उच्चांकी ४२ अंशांवर पोचलेल्या भिरा येथे पारा तब्बल १० अंशांनी उतरून ३१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शनिवारी (ता. १७) राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर रविवारपासून कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळत असून, शुक्रवारी हे क्षेत्र लक्षद्वीप परिसरावर होते. बंगालच्या उपसागरात विरोधी दिशेने फिरणाऱ्या चक्राकार वाऱ्यामुळे (अॅन्टी सायक्लोन) दक्षिण भारतात वाष्पाचा पुरवठा होऊन पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस मध्य आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांतील कमाल तापमानात मोठी घट झाली. कोकणातील भिरा, सांताक्रूज, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सांगली, महाबळेश्‍वर येथे गुरुवारचा दिवस थंड ठरला आहे. रात्रीचे तापमान १० अंशांपेक्षा अधिक असताना, दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी घट झाल्यास तो दिवस थंड ठरतो. तसेच कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तो दिवस अतिथंड ठरतो. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे दिवसाच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ६.८ अंशांनी घट झाली.

शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७, नगर ३२.०, कोल्हापूर ३१.०, महाबळेश्वर २५.६, नाशिक ३०.५, सांगली ३१.०, सातारा ३२.६, सोलापूर ३४.८, मुंबई २८.०, अलिबाग २९.०, रत्नागिरी ३२.०, डहाणू ३२.४, भिरा ३१.३, औरंगाबाद ३३.१, परभणी ३५.५, नांदेड ३७.०, अकोला ३५.१, अमरावती ३४.४, बुलडाणा ३१.७, चंद्रपूर ३७.६, गोंदिया ३५.०, नागपूर ३६.२, वर्धा ३६.३, यवतमाळ ३५.०. 

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...