agriculture news in marathi, weather, rise in temperature and scattered rain prediction in state | Agrowon

तापमान वाढणार; तुरळक पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने रविवारी राज्यात, तर मंगळवारपर्यंत (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून, शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंत अकोला येथे उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारनंतर राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ हाेण्याची शक्यता आहे.  

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने रविवारी राज्यात, तर मंगळवारपर्यंत (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून, शनिवारी (ता. १४) सकाळपर्यंत अकोला येथे उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारनंतर राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ हाेण्याची शक्यता आहे.  

दक्षिण कर्नाटक ते केरळपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाह खंडित झालेले आहे. तर नैर्ऋत्य मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. रविवारी राज्यात सर्वत्र तर मंगळवारपर्यंत (ता. १७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. दोन दिवस राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमाल तापमान ३७ अंश ते ४१ अंशांच्या आसपास, तर कोकणात ३१ ते ३३ अंशांच्या जवळपास आहे. 

शनिवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, नगर ४०.६, जळगाव ४१.२, कोल्हापूर ३६.९, महाबळेश्वर ३३.१, मालेगाव ४०.८, नाशिक ३८.१, सांगली ३८.०, सातारा ३७.६, सोलापूर ३९.५, मुंबई ३२.७, अलिबाग ३१.०, रत्नागिरी ३३.८, डहाणू ३२.४, आैरंगाबाद ३८.०, परभणी ४०.३, नांदेड ४०.५, अकोला ४१.३, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.०, चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३८.२, नागपूर ३८.५, यवतमाळ ३९.५.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...