agriculture news in marathi, weather, South-west Monsoon finally retreated from the India | Agrowon

देशातून मॉन्सून परतला; थंडीची चाहूल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे ः नैऋत्य मोसमी वारे बुधवारी (ता. २५) संपूर्ण देशातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तर, राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.४ अंशांपर्यंत घट झाली आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत नगरमध्ये १२.३ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः नैऋत्य मोसमी वारे बुधवारी (ता. २५) संपूर्ण देशातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तर, राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.४ अंशांपर्यंत घट झाली आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत नगरमध्ये १२.३ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

आज (गुरुवारी) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. उद्या (शुक्रवारी) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सध्या उत्तरेकडून वाहू लागलेले थंड वारे आणि दक्षिणेकडील वाढत असलेल्या कमाल तापमानामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथे ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाड्याच्या काही भागांत, तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. नगरपाठोपाठ परभणी येथे सरासरीच्या तुलनेत ५.१ अंशापर्यंत घट होऊन १४.४ किमान तापमानाची नोंद झाली होती. तसेच नागपूर, सोलापूर, अकोला येथील सरासरीच्या तुलनेत ३.५ अंशाने घट झाली आहे. 

बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल, कंसात किमान तापमान ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई ३५.५ (२४.२), सांताक्रूझ ३५.६ (२१.४), अलिबाग ३५.६ (२१.६), रत्नागिरी ३५.० (२३.५), डहाणू ३३.५ (२१.५), पुणे ३२.४ (१५.१), नगर - (१२.३), जळगाव ३४.०, कोल्हापूर ३२.२ (१९.९), मालेगाव ३३.४ (१६.०), नाशिक ३२.५ (१३.८), सांगली ३३.४ (१८.०), सातारा ३२.१ (१५.५), सोलापूर - (१६.७), उस्माबाद - (१४.१), औरंगाबाद ३३.६ (१६.०), परभणी ३४.० (१४.४), नांदेड - (१८.०), अकोला ३५.८ (१६.५), अमरावती ३१.८ (१६.४), बुलडाणा ३२.० (१७.६), ब्रह्मपुरी ३४.८ (१७.९), 
चंद्रपूर ३५.० (१९.४), गोंदिया ३३.८ (१७.५), नागपूर ३४.३ (१५.०), वाशीम ३३.० (१७.२), वर्धा ३५.० (१५.९), यवतमाळ ३४.५ (१५.०) 

इतर अॅग्रो विशेष
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे...
हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवसमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे...
अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...
पैसे भरून प्रलंबित कृषिपंपांना...मुंबई : पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे २...
डोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...
बारा प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा...मुंबई : राज्यात ३ वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा...
पणन आयुक्तपदी संपदा मेहतामुंबई ः राज्यातील तूर, हरभरा आदी शेतीमालाच्या...
सहकार चळवळीने २५ वर्षांत शेतीची प्रगती...बारामती, जि. पुणे : १९६५ ते १९९० चा काळ हा...
मृदसंधारणाचे तपासणी अहवाल न पाठविल्यास...पुणे : राज्यातील मृदसंधारणच्या कामात गावपातळीवर...
देशात यंदा सर्वसाधारण माॅन्सून : हवामान...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
साखर २५०० रुपयांपर्यंत घसरेल : शरद पवारबारामती, जि. पुणे : देशात उसाचे उत्पादन खूप व...
जमीन सुपीकतेविषयी आज पुण्यात चर्चासत्रपुणे : ''सकाळ-अॅग्रोवन''च्या तेराव्या वर्धापन...
लातुरात हरभरा खरेदी योजनेचा फज्जालातूर ः जाहिरातबाजी करून आम्ही शेतकऱ्यांच्या...