agriculture news in marathi, weather stations installation, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018
पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांत शंभर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयास प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची रॅंडम पद्धतीने तपासणी करून त्यासंबधी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी येत्या रविवारपर्यंत (ता. २५) सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्तलयातील सूत्रांनी दिल्या आहेत. 
 
पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांत शंभर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयास प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची रॅंडम पद्धतीने तपासणी करून त्यासंबधी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी येत्या रविवारपर्यंत (ता. २५) सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्तलयातील सूत्रांनी दिल्या आहेत. 
 
महावेध प्रकल्प हा सार्वजनिक व खासगी भागीदारीतून उभारला आहे. या माध्यमातून राज्यात प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर एक याप्रमाणे स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे उभारलेले आहे. या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी सर्वसाधारण प्रदेशात आणि डोंगराळ प्रदेशात करण्यात आली आहे. 
 
या हवामान केंद्रातील संवेदक तापमान, पर्जन्य, आर्द्रता आणि वारा या महत्त्वपूर्ण घटकांच्या नोंदी घेणार आहे. त्यासाठी सौरघटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे देखभालीचा खर्च कमी लागणार आहे. याशिवाय ही सर्व स्वयंचलित हवामान केंद्रे स्कायमेट माहिती  संकलकांशी जोडली असून, संवेदकाद्वारे नोंद केलेली हवामानाची आकडेवारी तेथेच संकलित होईल.
 
जमा झालेली हवामानविषयक माहिती हवामानाधारित पीकविमा योजना, हवामान अंदाज, पीकविषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी सात वर्षे आहेत. 
 
स्कायमेटने या प्रकल्पाकरिता डेटा व्यवस्थापन आणि वितरणासाठी समर्पित पोर्टल विकसित केले आहे. जेणेकरून कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास गाव, तालुका, जिल्हा पातळ्यांवरील आवश्‍यक हवामानविषयक माहिती सहजपणे मिळू शकेल.
 
या पोर्टलमध्ये अत्यंत साधी आणि सोपी रचना, विविध डाउनलोड पर्याय, दैनंदिन सरासरी, कमाल आणि किमान तापमान नोंदीची उपलब्धता आणि कोणत्याही हवामान घटकांचा विशिष्ठ दिवशी असलेला सर्वसाधारण कल आदी यात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच ही यंत्रणा कार्यन्वित होणार  आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...