agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

गोंदियाचा पारा १० अंशांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

पुणे : उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे विदर्भातील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी भागात थंडीने चांगलीच हुडहुडी भरवली आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १०.० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे विदर्भातील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी भागात थंडीने चांगलीच हुडहुडी भरवली आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १०.० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. मराठवाड्यात किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून, काही ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. कोकणातही काही भागात थंडीमध्ये चढउतार होत आहे. उर्वरित भागात हवामान सरासरीएवढेच होते.

यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागात सायंकाळी हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे रात्रीचा किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे; परंतु पहाटे चांगलीच थंडी हुडहुडी भरत आहे. कोकणातील रत्नागिरी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुनलेत एक अंश सेल्सिअसने घट झाली असून, किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस एवढे होते. अलिबाग, डहाणू येथील किमान तापमानात किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. जळगाव, सातारा, नाशिक, सातारा येथील किमान तापमानात किंचित घट झाली. सोलापूरमधील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घटले.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाच अंश सेल्सिअसने घट होऊन 10.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली. औंरंगाबाद, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. बीड, नांदेड येथील किमान तापानात किंचित घट झाली. विदर्भातील गोंदिया, यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने घट झाली. नागपुरात पाच अंशाने घट झाली असून, पारा दहा अंशांपर्यंत खाली आला आहे. उर्वरित अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा येथील किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. त्यामुळे अनेक भागात थंडी हळूहळू वाढू लागली आहे.

सोमवारी (ता.27) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रूझ) 19.5, अलिबाग 20.2 (1), रत्नागिरी 19.3 (-1), डहाणू 20.2 (1), ठाणे 24.2, भिरा 18.5, नगर 11.4 (-2), पुणे 12.5 (1), जळगाव 12.6 (-1), कोल्हापूर 17.5 (1), महाबळेश्वर 15.2 (1), मालेगाव 13.5 (1), नाशिक 11.2 (-1), सांगली 15.0, सातारा 14.4(-1), सोलापूर 13.3 (-3), औरंगाबाद 13.4, बीड 13.8 (-1), परभणी 10.5 (-5), नांदेड 13.0 (-1), उस्मानाबाद 10.9,अकोला 12.6 (-3), अमरावती 13.4 (-3), बुलडाणा 13.6 (-3), चंद्रपूर 14.0 (-1), गोंदिया 10.0 (-5), नागपूर 10.6 (-4), वर्धा 12.4(-3), यवतमाळ 11.0 (-5)
 

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...