agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

थंडी वाढू लागली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे. यामुळे थंडीत वाढ होत असून बुधवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी येथे 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे. यामुळे थंडीत वाढ होत असून बुधवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी येथे 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथील किमान तापमानात घट होऊ लागली आहे, त्यामुळे सायंकाळपासून हवेत गारवा तयार होत आहे. रात्री थंडीस सुरवात होत असून, पहाटे चांगलीच थंडी नागरिकांना हुडहुडी भरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सकाळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सध्या विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून, काही ठिकाणी किमान तापमान सरासरीएवढे होते. कोकणातही थंडी वाढू लागली आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे.

कोकणातील रत्नागिरी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली असून, किमान तापमान 18.3 अंश सेल्सिअस एवढे होते. ठाणे येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. तर मुंबई, अलिबाग, डहाणू, भिरा येथील किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. त्यामुळे कोकणातही हळूहळू थंडी जोर धरू लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर येथे सर्वांत कमी म्हणजेच 9.7 अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते चार अंश सेल्सिअसने घट झाली. तर कोल्हापूर, सांगली येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाच अंश सेल्सिअसने घट झाली. औरंगाबाद, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीएवढे होते, तर बीडमधील किमान तापानात किंचित घट झाली. विदर्भातील गोंदिया, नागपूर येथील किमान तापमानाचा पारा 11 अंशांपर्यंत खाली आला होता. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी घटला होता. त्यामुळे अनेक भागांत थंडी हळूहळू जोर धरू लागली आहे.

बुधवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (सांताक्रूझ) 18.6 (-1), अलिबाग 19.0 (-1), रत्नागिरी 18.3 (-3), डहाणू 18.9 (-1), ठाणे 24.2, भिरा 17.5 (-1), नगर 9.7 (-4), पुणे 11.5 (-1), जळगाव 11.2 (-2), कोल्हापूर 16.4, महाबळेश्वर 14.4 (1), मालेगाव 13.6 (1), नाशिक 10.8 (-1), सांगली 15.6, सातारा 12.4 (-3), सोलापूर 12.5 (-4), औरंगाबाद 12.4, बीड 13.8 (-1), परभणी 9.6 (-5), नांदेड 15.0 (1), उस्मानाबाद 10.1, अकोला 15.0 (-1), अमरावती 14.8 (-2), बुलडाणा 15.2 (-1), चंद्रपूर 15.6 (1), गोंदिया 11.0 (-4), नागपूर 11.6 (-3), वर्धा 12.5 (-3), यवतमाळ 12.4 (-3)

इतर अॅग्रो विशेष
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
‘सह्याद्री’ च्या शिवारात हवामान अाधारित...अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल या प्रणाली...