agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

थंडीत होतोय चढउतार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली, तर कोकण, मराठवाड्यात चढउतार सुरू आहे. गुरुवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे 10.2 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली, तर कोकण, मराठवाड्यात चढउतार सुरू आहे. गुरुवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे 10.2 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोकणातील भिरा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुनलेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली असून, किमान तापमान 18.0 अंश सेल्सिअसएवढे होते. त्यापाठोपाठ डहाणू येथील किमान तापमान 18.7 अंश सेल्सिअस एवढे होते, तर मुंबई, अलिबाग येथील किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. त्यामुळे कोकणातही हळूहळू थंडी जोर धरू लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिकपाठोपाठ नगर येथे सर्वांत कमी म्हणजेच 10.9 एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, जळगाव, मालेगाव, सातारा, सांगली, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली, तर कोल्हापूर, महाबळेश्वर येथील किमान तापमान सरासरीएवढे होते.

मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे सर्वांत कमी म्हणजेच 11.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर परभणी, नांदेड येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक एक ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली. औरंगाबाद, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. विदर्भातील गोंदिया येथील किमान तापमानाचा पारा 10.8 अंशांपर्यंत खाली आला होता, तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी घटल्याने विदर्भात थंडी जोर धरू लागली आहे.

चक्रीवादळाची निर्मिती
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याचे रूपांतर बुधवारी (ता. 29) चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागराच्या कोमोरीन भागात असून, ते श्रीलंकेकडे सरकत आहे. श्रीलंकेपासून ते सुमारे 340 किलोमीटर अंतरावर, तर कन्याकुमारीच्या दक्षिणेकडे 60 किलोमीटर, तिरुअनंतपुरमपासून 120 किलोमीटर, मिनीकॉंयपासून 480 किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ लक्षद्वीपच्या परिसरात दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता असून, नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे तमिळनाडू, केरळचा दक्षिण भाग, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

गुरुवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (सांताक्रूझ) 18.0(-2), अलिबाग 19.0 (-1), रत्नागिरी 20.4, डहाणू 18.7 (-1), ठाणे 24.2, भिरा 18.0, नगर 10.9 (-3), पुणे 11.6 (-1), जळगाव 12.0 (-1), कोल्हापूर 16.5, महाबळेश्वर 14.2, मालेगाव 13.5 (-1), नाशिक 10.2 (-2), सांगली 16.8 (2), सातारा 13.7 (-1), सोलापूर 14.7 (-2), औरंगाबाद 12.0, परभणी 12.5 (-3), नांदेड 15.5 (1), उस्मानाबाद 11.4, अकोला 14.0 (-2), अमरावती 14.2 (-3), बुलढाणा 15.3 (-1), चंद्रपूर 15.6 (1), गोंदिया 10.8 (-4), नागपूर 12.5 (-2), वर्धा 12.7(-3), यवतमाळ 14.0 (-2)

इतर अॅग्रो विशेष
भारतााला भारताला 'बीजी थ्री’कापसाची...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
नवे संशोधन, नवे वाण ही काळाची गरज...आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारास झालेला विलंब...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...
माॅन्सूनची प्रगती शनिवारनंतर ?पुणे : जवळपास आठवडाभरापासून नैऋत्य मोसमी...
`एचटीबीटी` कापूस बियाण्याच्या...पुणे : बोंड अळीला प्रतिकारक म्हणून चढ्या...
बोंड अळी नियंत्रणासाठी `गुजरात पॅटर्न`...बोंडअळी निर्मूलनासाठी गुजरात राज्यात कापूस...
शेतकऱ्यांना देणार उत्तम पर्याय : नॅशनल..."बीटी तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढली, असा गैरसमज...
कपाशीत आधुनिक तंत्रज्ञान वापरात चीनची...कृषी उत्पादकता वाढीसाठी जाणीवपूर्वक व नियोजनबद्ध...
बोंड अळीच्या धास्तीमुळे कापसातील तेजी...पुणे : यंदाच्या हंगामात आंतरराष्ट्रीय आणि...
दुधानंतर आता गायींचे दर घसरलेसांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी...
मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना...मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार;...पुणे  : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण...
तेलबिया आयात शुल्कवाढ, साठामर्यादा...मुंबई ः केंद्र सरकारने नुकतेच आयात होणाऱ्या कच्चे...
दूध दर, एफआरपीप्रश्नी मोर्चा काढणार ः...कोल्हापूर : उसाची थकीत एफआरपी व गाय दूध...
कर्जमाफीच्या याद्या क्लिष्टपरभणी : जिल्ह्यात यंदा खरीप पीककर्ज वाटपाची गती...
राज्यात मुगाचा पेरा घटण्याचे संकेतपुणे : राज्यात पावसाचा खंड सुरू असल्यामुळे यंदा...