agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

कोकणात हलक्‍या पावसाची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

ओखी चक्रीवादळाचा काहीसा परिणाम राज्याच्या काही भागावर शक्‍य आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान असून, सोमवारी, मंगळवारी कोकणात हलक्‍या पावसाची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात भागांत ढगाळ हवामान राहील.
-ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

पुणे : लक्षद्वीपच्या परिसरात असलेल्या ओखी चक्रीवादळ देशाच्या पश्‍चिम उत्तर दिशेला सरकत आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही भागांत होण्याची शक्‍यता आहे. येत्या सोमवारी व मंगळवारी कोकणात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता असून, राज्याच्या उर्वरित भागात कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील किमान तापमानावर दिसायला सुरवात झाली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. 1) नाशिक येथे 11.3 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असून, येते चार ते पाच दिवस
किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होईल.

सध्या ओखी या चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केले आहे. त्यामुळे म्यानमार जवळील वादळामधील बरेच ढग श्रीलंका देशावर आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवस या चक्रीवादळाची तीव्रता कायम राहील. त्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता आहे. मात्र या चक्रीवादळामुळे कोकणातील मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागांत, मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, नाशिक, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली व पुढे विदर्भातील काही जिल्ह्यांपर्यंत ढगाळ हवामानाचा पट्टा पसरला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस चार ते पाच दिवस राहील.

चक्रीवादळाचा अपेक्षेप्रमाणे जास्त प्रमाणात या वादळाने गुरुवारी (ता.30) सायंकाळपासून अधिक प्रभाव दाखवायला सुरवात केली. येत्या आठवड्यात या वादळाची तीव्रता कमी होऊन अरबी समुद्रात शांत होण्याची शक्‍यता आहे. सध्या या चक्रीवादळामुळे विदर्भात काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. पुणे परिसरातही रविवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

शुक्रवारी (ता.1) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः
मुंबई (सांताक्रूझ) 19.1, अलिबाग 19.0 (-1), रत्नागिरी 22.8 (2), डहाणू 19.4 (-1), भिरा 18.8, नगर 12.8, पुणे 12.7, जळगाव 12.8, कोल्हापूर 18.8, महाबळेश्वर 14.2, मालेगाव 13.6, नाशिक 11.3, सांगली 17.2 (2), सातारा 16.1 (1), सोलापूर 15.5, औरंगाबाद 14.3, परभणी 12.0 (-3), नांदेड 15.5 (1), उस्मानाबाद 11.9, अकोला 13.7 (-1), अमरावती 15.6, बुलडाणा 14.4, चंद्रपूर 15.6 (1), गोंदिया 12.0 (-2), नागपूर 12.2 (-1), वर्धा 13.3 (-2),
यवतमाळ 14.0 (-2)

 

इतर अॅग्रो विशेष
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे...
हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवसमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे...
अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...