agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 डिसेंबर 2017

पुणे : ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी आणि गुजरातला चांगलाच तडाखा बसला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाण्यासह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हलका पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाला, फळबागांमध्ये द्राक्षे, डाळिंब अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत ढगाळ होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : ओखी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी आणि गुजरातला चांगलाच तडाखा बसला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाण्यासह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हलका पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाला, फळबागांमध्ये द्राक्षे, डाळिंब अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत ढगाळ होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

ओखी चक्रीवादळात आता ईशान्येकडे सरकत आहे. मंगळवारी (ता. ५) हे चक्रीवादळ मुंबईपासून सुमारे २३० किलोमीटर अंतरावर होते. त्याची तीव्रता आता कमी होऊन त्याचे रूपांतर अति कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून, गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मध्यरात्रीपर्यंत आले होते. त्यामुळे गोव्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नाशिक, ठाणे परिसरांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. 

चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर व किनारपट्टीलगत ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात २५ ते ३५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. आजही (ता. ६) महाराष्ट्राच्या लगतचा समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांनी उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतच्या समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. 

चक्रीवादाळाच्या परिणामामुळे विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. गोंदिया येथील किमान तापमानाता सरासरीच्या तुलनेत सात अंशाने कमी झाली आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे ६.५ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

थंडी पुन्हा परतणार 
आज आणि उद्या काही प्रमाणात कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. परंतु येत्या शुक्रवार व शनिवारपासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, गोव्याला पावसाचा फटका 
लक्षद्वीपकडून आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह, गुजरातला चक्रीवादळामुळे झालेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. काही ठिकाणी जोरदारा गारांचाही पाऊस पडला असून फळबागांमध्ये केळी, आंबा, द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक व्यवस्थाही खोळंबली असल्याचे चित्र होते. 

मंगळवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई (सांताक्रूझ) २१.० (-१), अलिबाग २१.४, रत्नागिरी २४.१ (३), डहाणू १९.०, नगर १९.२ (७), पुणे १९.३ (६), जळगाव १५.० (१), कोल्हापूर २१.१(४), महाबळेश्वर १५.२ (१), मालेगाव २०.० (७), नाशिक १७.७ (६), सांगली २०.० (४), सातारा १९.७ (५), सोलापूर १६.८ (-१), औरंगाबाद १६.६ (४), परभणी १४.० (-४), नांदेड १५.५ (१), बीड १६.४, अकोला १५.५ (१), अमरावती १६.० (२), बुलडाणा १७.४ (२), चंद्रपूर १६.०, गोंदिया ६.५ (-७), नागपूर ११.९ (-१), वाशीम १४.०, वर्धा १२.४ (-३), यवतमाळ १७.० (२).   

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...