agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

...आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे : ओखी चक्रीवादळाची तीव्रता कमी होत नाही, तेच बंगालाच्या उपसागरात दुसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. मच्छलिपट्टणमपासून ११६०, गोपालपूरपासून १२५० किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या दिशने सरकत असून, ते आंध्र प्रदेश, तमिळनाडू व ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. या चक्रीवादळाचा परिणाम मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्राला जाणवण्याची शक्यता आहे. 

पुणे : ओखी चक्रीवादळाची तीव्रता कमी होत नाही, तेच बंगालाच्या उपसागरात दुसरे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. मच्छलिपट्टणमपासून ११६०, गोपालपूरपासून १२५० किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या दिशने सरकत असून, ते आंध्र प्रदेश, तमिळनाडू व ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. या चक्रीवादळाचा परिणाम मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्राला जाणवण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ओखी चक्रीवादळानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतील किमान तापमानात वाढ झाली. बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

चक्रीवादळामुळे कोकण, गोव्यात बहुतांशी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला होता. त्याचा परिणाम किमान तापमानावर झाला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. विदर्भाच्या काही भागांत लक्षणीय, तर कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.  

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज (ता. ८) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील. उद्या (शुक्रवारी) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहणार असून, शनिवार (ता. ९) पासून कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. त्यामुळे गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे. 

सध्या ओखी चक्रीवादळ काही प्रमाणात शांत झाले आहे. परंतु या चक्रीवादळामुळे गुजरातमधील उमेरगाम, वापी, पार्डी, वाघई, वानसडा, गनदेवी, धर्मापूर, वलसाड, चिखली, कापर्डा, व्यारा, वळोद, महाराष्ट्रात डहाणू, तलासरी, कोलंबा, पालघर, मालवण, विक्रमगड, वसई, सांताक्रूझ या ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, त्याच्या परिणामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  

बुधवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई (सांताक्रूझ) २०.२ (१), अलिबाग २४.२ (५), रत्नागिरी २३.१ (२), डहाणू २०.१ (१), भिरा  २२.५ (४), नगर १९.४ (७), पुणे २१.१ (८), जळगाव १७.० (४), कोल्हापूर २०.०(-४),  महाबळेश्वर १५.६ (२), मालेगाव १८.० (५), नाशिक १७.८ (७), सांगली १९.२ (४), सातारा १९.१ (-५), सोलापूर १९.९ (३), औरंगाबाद १९.० (७), बीड २०.४ (७), उस्मानाबाद १४.९, परभणी १६.६ (२), नांदेड १८.० (५), बीड १६.४, अकोला १९.० (४), अमरावती १७.४ (१), बुलडाणा १९.२ (४), चंद्रपूर १७.३ (३), गोंदिया ९.८ (-४), नागपूर १३.७, वर्धा १५.७ (१), यवतमाळ १७.० (२).

इतर अॅग्रो विशेष
साखर उद्योगासाठी तातडीने प्रयत्न करा :...नवी दिल्ली : अडचणीतल्या साखर उद्योगाला तातडीने...
आदेश पोचले, खरेदी ठप्पच !औरंगाबाद : तूर खरेदीसाठीच्या मुदतवाढीचे आदेश अखेर...
कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभावनवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला...
सोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबलीजालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष...
वेंगुर्ला तालुक्यातील गावांनी जपलाय...सह्याद्रीच्या कडेकपारीत शेकडो वैशिष्ट्यपूर्ण व...
राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवरपुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य...
नागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे...पुणे : कृषी विभागातील बदल्यांमागे घडणाऱ्या खऱ्या...
महाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्यपुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र...
रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ...मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या...
शेतकरी, साखर कारखान्यांनी रस्त्यावर...सातारा : केंद्र आणि राज्य सरकार यांचा साखर...
दूधप्रश्नावरील आंदोलनाच्या समन्वयासाठी...नगर : दर मिळत नसल्याने मोफत दूध देऊन आंदोलन...
साखर खरेदी, निर्यात अनुदानावर लवकरच...पुणे : साखर कारखान्यांना मदतीची भूमिका राज्य...
उसाचा तब्बल ११ वा खोडवा !!खेड (ता. कर्जत, जि. नगर) येथील उदयसिंह हिंदूराव...
इंधनाचा भडकाएप्रिल महिन्यात राज्यातील तापमान ४० अंश...
हमीभावाने खरेदीत हवी विश्वासार्हताशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढविण्याच्या...
उन्हामुळे लाही लाहीपुणे : वाढलेल्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत...
साखरेवर कर, इथेनॉलवरील जीएसटी कमी...नवी दिल्ली ः देशात सध्या साखरेचे दर पडल्याने...
तूर खरेदीत राज्याला एक हजार कोटींचा...मुंबई ः अगदी सुरवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात...
व्यावसायिक पिकांसह ‘हायटेक’ फुलशेतीचा...डोंगरकडा (जि. हिंगोली) येथील नागेश खांडरे या कृषी...