agriculture news in marathi, weather, temperature | Agrowon

कमी दाबाचे क्षेत्र अाेडिशा, आंध्र प्रदेशकडे सरकणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

पुणे : बंगालच्या उपसागरात तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू अाेडिसा, आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र गोपालपूरपासून आग्नेयकडे ८७० किलोमीटर, मच्छिलपट्टनमपासून ८७५ किलोमीटरवर अाहे. या क्षेत्राची तीव्रता कमी असल्यामुळे राज्यात पुन्हा थंडी परतण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरात तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू अाेडिसा, आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र गोपालपूरपासून आग्नेयकडे ८७० किलोमीटर, मच्छिलपट्टनमपासून ८७५ किलोमीटरवर अाहे. या क्षेत्राची तीव्रता कमी असल्यामुळे राज्यात पुन्हा थंडी परतण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवार ते रविवारपर्यंत आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि अाेडिच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ताशी ४० ते ६० किलोमीटर अंतराने वारे वाहत आहे. रविवारनंतर या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. 

कोकण, गोवा, मराठवाड्यात गुरुवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या काही भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.  

ओखी चक्रीवादळ गेल्याने राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. पुणे परिसरात आज अंशत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारपर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहील. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडी परतण्याची शक्यता आहे. विदर्भातील गोंदिया येथे गुरुवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत ९ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट ः अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई (सांताक्रूझ) १९.८, अलिबाग १९.६, रत्नागिरी २१.१, डहाणू १७.४, भिरा २०, नगर १९.६, पुणे १७, जळगाव १७.२, कोल्हापूर १९.९,  महाबळेश्वर १२.९, नाशिक १६.३, सोलापूर २०.१, औरंगाबाद १९.७, उस्मानाबाद १६.४, परभणी २०.४, अकोला १९.६, अमरावती १८.२,  बुलढाणा १९.३, चंद्रपूर १८.२, नागपूर १५.६, वर्धा १७.०.

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...